Uncategorized

शेतकरी पुत्र मंगेश पाटील इंगोले यांना उत्कृष्ट दुग्ध व्यवसाय पुरस्कार प्रदान

मुखेड प्रतिनिधी:-

मुखेड तालुक्यातील बेरळी बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी श्री मंगेश पाटील इंगोले यांना उत्कृष्ट दुग्ध व्यवसाय पुरस्काराने काल नांदेड येथील एका कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट दुग्ध व्यवसाय पुरस्कार बेरळी बुद्रुक येथील प्रगतिशील शेतकरी श्री केशवराव पाटील इंगोले यांचे सुपुत्र तथा शेतकरी पुत्र श्री मंगेश पाटील इंगोले यांना आज नांदेड येथे एका समारंभामध्ये राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते देऊन गौरविण्यात आले.

यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता ताई पाटील, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार,भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे आमदार बालाजीराव कल्याणकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमाचे आयोजन पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे भागवत देवसरकर यांनी आयोजन केले होते.

शेतकरी पुत्र मंगेश पाटील इंगोले बेळीकर यांच्या दुग्ध व्यवसायातील उत्कृष्ट कामगिरी लक्षात घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला मंगेश पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे आमदार डॉ. तुषार राठोड, लक्ष्मणराव पाटील खैरकेकर, आनंदराव पाटील जुन्ने, राम पाटील जुन्ने, यशवंत पाटील बोडके, शिवराज पाटील पांडुर्णीकर , शिवराज पाटील बेळीकर, डॉ. किशनराव इंगोले, शिवाजी पाटील इंगोले, पांडुरंग पाटील जुन्ने,संतोष पाटील इंगोले आदींनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button