Uncategorized

दगडी फळ अशी ओळख असलेल्या सिताफळाची आवक वाढली

मुखेड प्रतिनिधी:-

   सीताफळाचा हंगाम पोळा सणा पासून सुरू होऊन एक महिन्याने अधिक झाले असले तरी बाजारात आता उशिराने का होईना, सीताफळाचा मुख्य हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे बाजारात आता चांगली मोठी सीताफळे दिसू लागली आहेत मुखेड मधील बाजारात सध्या चांगल्या प्रमाणात सीताफळ येत आहेत, शिवाय त्यांचे दरही आवाक्यात असल्याने ग्राहकांना मोठ्या प्रमाणात त्यांचा आस्वाद घेता येत आहे.

मुखेडच्या बाजारात सध्या . दररोज चार ते पाच गाड्या सीताफळ येत आहेत. हे सीताफळ शिकारा,जुना,येवती, दबडे शिरूर ,पांडुर्णी, सावरगाववाडी,अखरगा,हसनाळ, हतराळ,मधून येत आहेत. या वर्षी सीताफळाची आवक काहीशी उशिराने सुरू झाली आहे. मात्र आता आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. या पुढेही ही आवक अशीच वाढणार आहे. आवक समाधानकारक असल्याने सीताफळाचे दरही आवाक्यात राहणार असल्याची माहिती सीताफळच्या व्यापाऱ्यांनी दिली. सध्या बाजारात एक टोकरे सीताफळ 300 ते 400 रुपये  दराने विकले जात आहेत. एक टोकऱ्या मध्ये अंदाजे 10 किलो सीताफळ बसत आहे दर नियंत्रणात असल्याने ग्राहकांचीही त्यांना विशेष मागणी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. दिवाळीच्या हंगामात मोठ्या प्रमाणात सीताफळ बाजारात येतात, त्यावेळी त्यांचे दरही खाली आलेले असतात. आता दिवाळीपर्यंत ही आवक अशीच सुरू राहणार आहे आणि दरही नियंत्रणात राहणार असल्याची खात्री व्यापाऱ्यांना आहे.

किरकोळ बाजारातही उच्च प्रतीचे सीताफळ दिनशे ते तीनशे रुपये टोकऱ्या त्या खालोखाल असणारे सीताफळ  दीडशे ते दोनशे रुपये टोकऱ्या दराने मिळत आहेत.

आवक चांगली असल्याने सध्या खाण्यासाठी आणि त्याच बरोबर आईस्क्रीम कंपन्यांकडून सीताफळांना मागणी वाढत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button