Uncategorized

पंतप्रधान,मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेवर काळे फासणाऱ्या आंदोलकांवर मुखेडात गुन्हा दाखल

मुखेड प्रतिनिधी:-

मुखेड येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू असून या आंदोलकांनी २९ ऑक्टोंबर रोजी बसेसवर असलेल्या जाहिरातीवरील पंतप्रधान , मुख्यमंत्री , दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेवर काळे फासणाऱ्या आठ आंदोलकांवर मुखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सर्वत्र सकल मराठा बांधवांच्या वतीने आंदोलने होत असून सदरील आंदोलने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळे आंदोलन करीत आहेत. या पार्श्वभूमीवर बसेस वरील जाहिरातीवर छापलेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमा असलेल्या प्रत्येक बसेसवर वेगवेगळ्या शासनाच्या जाहिराती असून या जाहीरातीवरील प्रतिमेला काळे फासले होते. दरम्यान वाहतूक निरीक्षक अक्षय वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सचिन सखाराम पाटील, रामदास सदाशिव पाटील व इतर पाच ते सहा जणांनी नरसी मार्गावरून जाणाऱ्या बसेसला छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारकाजवळ रस्त्यावर थांबवून काळे फासले आहे. यात बस क्रमांक एम. एच. १४ बीटी १६२३, एम. एच. २० बी. एल. १६५३, एम. एच. २० बी. एल. १२३१, एम. एच. ४० एन. ९१७८, एम. एच. १४ बि. टी. १५१७, एम. एच. २० बी. एल. २३४२, एम. एच. २० बी. एल. १३१९, एम. एच. २० बी. एल. १६५२, एम. एच. २० बी. एल. ९९९५, एम. एच.१४ बी. टी. १९९२, एम. एच. १४ बि. टी. ३०११, एम. एच. १४ बी. टी. २५२७, एम. एच. २० बी. एल. ०६४४, एम. एच.१४ बी. टी. २५२२, एम. एच.२० बी. एल. ०६४२, एम. एच. २० बी. एल. ०८४५, एम. एच. २० बी. एल. १९८९, एम. एच. १४ बी. टी. १४२७, एम. एच. २० बी. एल. १९२५ एम. एच. २४४० व एम. एच. १४ बी. टी. १५१४ या २१ बस गाड्यावरील जाहीरातीवरील प्रतिमेला काळे फासल्याने मराठा आंदोलक सचिन पाटील व रामदास पाटील या दोघांसह इतर पाच ते सहा जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून शासनाच्या महांडळ बसेसना काळ्या रंगाचे ऑईल पेंट लावून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण केले असल्याने मुखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button