23 नोव्हेंबरला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात 6 विधानसभा व लोकसभेसाठी मतमोजणी

नांदेड प्रतिनिधी :-
नांदेड जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणूक व 9 विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजीमतदान झाले. निवडणूक आयोगाने 21 तारखेला दुपारी जाहिर केलेल्या अंतिम आकडेवारी नुसार नांदेडजिल्ह्याने यावेळी 2019 च्या तुलनेने विक्रमी मतदान केले असून यावेळी विधानसभेसाठी 69.45 टक्केमतदान झाले आहे. तर लोकसभा पोटनिवडणुकीतही गेल्या वेळेच्या तुलनेत 7 टक्के अधिक मतदान झालेअसून ही टक्केवारी 67.81 आहे.
उद्या शनिवार 23 नोव्हेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये ज्ञान स्त्रोत केंद्र ( नॉलेजरिसोर्स सेंटर ) येथे सकाळी 7 वाजल्यापासून मतमोजणी सुरु होणार आहे. पहिल्या व दुसऱ्या माळ्यावरविधानसभा व लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. पहिल्या माळयावर खोली क्रमांक 102 वखोली क्रमांक 6 याठिकाणी सहा विधानसभा क्षेत्राची मतमोजणी होणार असून सर्व मतयंत्र याठिकाणच्यास्ट्रॉगरुमध्ये पोहोचले आहे. तसेच दुसऱ्या माळ्यावर खोली क्रमांक 202 ते 206 मध्ये लोकसभापोटनिवडणुकीची मतमोजणी होणार आहे. याठिकाणच्या स्ट्रॉगरुममध्ये मतयंत्र पोहोचली आहेत. उमेदवारांच्या उपस्थितीत सर्व मतपेट्या स्ट्राँगरुममध्ये बंद झाल्या असून सीसीटीव्हीच्या निगराणीतठेवण्यात आल्या आहेत. 23 नोव्हेंबरला सकाळी उमेदवारांच्या व त्यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत मतदानयंत्र बाहेर काढले जातील व त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल. याठिकाणी वेगवेगळे कक्ष करण्यातआले असून उमेदवारांचे प्रतिनिधींसाठी देखील थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विधानसभेची 14 टेबलावर मोजणी होणार आहे. लोकसभा व विधानसभेसाठी 14 गुन्हीले 6 असे 84 टेबल लोकसभा आणिविधानसभासाठी असणार आहे. अंदाजे 24 ते 28 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.



