Uncategorized

काँग्रेसच्या नांदेड जिल्हा महानगर अध्यक्षपदी अब्दुल सत्तार यांची निवड

मुस्लिम समाजाला ३७ वर्षानंतर काँग्रेसकडून शहराध्यक्ष पद
मकबूल सलीम हे कॉंग्रेस पक्षाचे पहिले मुस्लिम शहराध्यक्ष
काँग्रेस पक्षाचे २० वर्ष नगरसेवक, स्थाई समिती सभापती, महापौर आणि मुस्लिम समाजाचा एक आश्वासक चेहरा म्हणून अब्दुल सत्तर यांची ओळख
नांदेड – सर्व नगरसेवकांनी मिळून अब्दुल सत्तार यांच्या नावाची शिफारस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली होती. त्यानुसार अब्दुल सत्तार यांची नांदेड शहर जिल्हाध्यक्ष पदी निवड केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून काँग्रेसला मजबूत करण्याची आणि भारतीय जनता पार्टीला हद्दपार करण्याची गरज असल्याचे मत नांदेड जिल्हा समन्वय समितीचे निरीक्षक माजी आमदार ईश्वराव भोसिकर यांनी व्यक्त केले.
भाजपा ला हद्दपार करण्याची गरज असल्याचे जिल्हा समन्वयक माजी आमदार ईश्वरराव भोसीकर म्हणाले. काँग्रेस पक्षाच्या नांदेड शहर जिल्हाध्यक्षपदी अब्दुल सत्तार यांची निवड झाल्याबद्दल नियुक्तीपत्र देताना ते बोलत होते.
काँग्रेस कार्यकर्ते तसेच मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात, फटाके फोडून अब्दुल सत्तार यांच्या काँग्रेस शहराध्यक्ष पदी निवडीचे स्वागत करून आनंद व्यक्त करण्यात आला.
सर्व जाती जमातीला सोबत घेऊन चालणारा काँग्रेस पक्ष आहे. भारत हा सर्व जाती धर्माच्या लोकांचा देश आहे. काँग्रेस चया विचारधारेला आपलेसे मानून सर्वांनी एकत्र येवून काम करण्याची गरज आहे. कोणताही व्यक्ती काँग्रेसमधून गेला तरी काँग्रेस संपणार नाही. तेवढ्याच ताकदीने काँग्रेस आणखी मजबूत होईल आणि जिल्ह्यात पसरेल असे माजी आमदार ईश्र्वरराव भोसीकर म्हणाले. यावेळी जिल्हा समन्वयक माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, दक्षिणचे आ. मोहनराव हंबर्डे, मराठवाडा निरीक्षक इसुफ भाई, कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांनी यावेळी आपले विचार मांडले. यावेळी प्रदेश सचिव आंबटवार, प्रदेश सचिव डॉ. रँपनवाड, जिल्हा काँग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सोनकांबळे, रमेश गोडबोले, किशोर हटकर, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शमीमभाई आदींची उपस्थीती होती. आभार माजी नगरसेवक सुरेश हाटकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button