Uncategorized

मुखेड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर.

पोटनिवडणुकितील चार ग्रामपंचायतीच्या चार जागा बिनविरोध.

मुखेड/ प्रतिनिधी

मुखेड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या ०३ प्रभागासाठी व ०५ ग्रामपंचायतील पोटनिवडणुकीच्या जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी व निकाल दि.०६ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयात निवडणूक विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले असुन निवडणूक निकालाची ज्या त्या गावातील मतदारांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली होती सोमवारी निकाल जाहीर होताच उमेदवारांच्या समर्थकांनी ढोल ताशाच्या गजरात,फटाक्यांची आतीषबाजी,गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला सदर निकालात कहीं खुशी तर कहीं गम पहावयास मिळाले.
  मुखेड तालुक्यातील कर्णा, सलगरा खुर्द,जांब खुर्द,पिपळकुठा,डोंगरगाव,मारजवाडी, वडगाव, थोटवाडी, लादगा सह १० गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे या सर्व ग्रामपंचायतीचा निवडणूक निकाल दि.६ नोव्हेंबर रोजी तहसिल कार्यालयात जाहीर करण्यात आला आहे यामध्ये वडगाव ग्रामपंचायतीच्या साबेराबी शेख, थोटवाडी येथील कलावतीबाई भुत्तापल्ले, मारजवाडी येथील नरसिंग वाघमारे व लादगा येथील दैवशाला शिकारे हे चार उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत तसेच इतर ०६ गावांमध्ये निवडणूक होवुन अटीतटीच्या लढती झाल्या आहेत.संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागुन असलेल्या कर्णा ग्राम पंचायतीचा निकाल धक्कादायक लागला असून अविनाश साखरे यांच्या पॅनलला मतदारानी मताचा कौल देत उमेदवारांना विजयी केले आहे विजयी उमेदवारांची नावे थेट जनतेतून सरपंच म्हणुन साखरे मीनाताई अविनाश ह्या विजयी झाल्या आहेत. सदस्य शिंगणवाड दिनकर माधव, सोमवारे आश्विनी गजानन, खांडेकर सोनाली बालाजी, गवळे दयानंद केरबा, सोमवारे शेषाबाई कोंडीबा, गवळे हणमंत शंकर, साखरे गजानन गंगाधर, धोते सुनिताबाई सूर्यकांत हे विजयी झाले आहेत तसेच सलगरा खुर्द एका जागेच्या पोटनिवडणुकीत सना माजीत शेख यांनी विजय प्राप्त केला आहे त्याचबरोबर पिपंळकुठा येथे दोन जागेसाठी पोटनिवडणुक पार पडली यात जयवंत एकनाथ तरंगे व शाहुबाई शिवाजी जाधव यांनी विरोधी उमेदवारास पराभूत करीत विजय मिळविला आहे तसेच जांब खुर्द येथे एका जागेसाठी निवडणूक झाली यात सोनकांबळे दिपक धोंडीबा या उमेदवाराने विजय प्राप्त केला आहे.त्याचबरोबर डोंगरगाव येथे एका जागेसाठी पोटनिवडणुक पार पडली यामध्ये सलिमाबी बशीर सय्यद यांनी आपल्या विरोधी उमेदवारास मोठ्या फरकाने पराभूत करीत दणदणीत विजय मिळवीला आहे मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी तहसीलदार राजेश जाधव, नायब तहसीलदार नंदकुमार भोसिकर, निवडणूक निर्णय अधिकारी सत्यजित रावळे, निवडणूक निर्णय अधिकारी आर.आर.कुंडलकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनोज राठोड, निवडणूक विभागाचे लिपिक प्रशांत लिबेंकर, शिपाई गोपिनाथ पिंगळे, शिपाई बलभिम चावरे, शिपाई गौस शेख, कोतवाल शिवानंद चंदापुरे यांनी काम पाहीले आहे तसेच शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी मुखेड व मुक्रामाबाद पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button