आज पासुन दहावीची परीक्षा; १४ परीक्षा केंद्रांवर ३ हजार ८२३ विद्यार्थी देणार परीक्षा

मुखेड प्रतिनिधी:-
माध्यमिक उच्च माध्यमिक शालांत १० वी बोर्डचे परीक्षेस दिनांक २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होत असूनतालुका परीरक्षक कार्यालय अंतर्गत १४ परीक्षा केंद्रावर ३ हजार ८२३ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून संपूर्ण कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीत पारपडण्यासाठी तयारी केली असल्याचे गटशिक्षण अधिकारी कैलास होनधरणे यांनी सांगितले आहे.
तालुक्यात जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड येथे २५० विद्यार्थी, गुरुदेव माध्यमिक विद्यालय मुखेड२५०, नृसिंह विद्यालय उमरदरी २४३, शाहीर आण्णाभाऊ साठे विद्यालय मुखेड ३१५, विद्या विकास विद्यालयबाराहाळी ३३१, माध्यमिक आश्रम शाळा चव्हाणवाडी ३६१, विद्यावर्धिनी विद्यालय दापका गुंडोपंत २२३, निती निकेतन माध्यमिक विद्यालय जांब १५८, जिल्हा परिषद हायस्कूल बेटमोगरा २५७, जिल्हा परिषदहायस्कूल जाहूर २०३, सेवादास माध्यमिक विद्यालय वसंतनगर ३८७, गंगाबाई माध्यमिक विद्यालयसावरगाव पिर २८८, जीप माध्यमिक पेठवडज ३७१, जनता माध्यमिक विद्यालय कौठा २५२, या १४ परीक्षाकेंद्रावर परीक्षा होत आहेत. यासाठी १४ बैठे पथक तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, मुख्याध्यापक सहनियुक्त करण्यात आले आहेत तर भरारी पथक तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्ष णाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांचे पथक गठित करण्यात आले आहे. परिरक्षक म्हणून एस. एस. करेवाड कामपाहणार आहेत. सर्व परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात करण्यात आले आहेत. बैठे पथकामध्ये केंद्रप्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आली असून भरारीपथकामध्ये राजेश जाधव तहसीलदार मुखेड, चंद्रशेखर रामोड गटविकास अधिकारी पंचायत समिती मुखेडयांची जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांना तपासून परीक्षादालनात प्रवेश देण्याची सूचना केंद्र संचालक यांना देण्यात आली आहे. केंद्र संचालकाचे शिवायकोणालाही परीक्षा केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्राचे नावेपुढीलप्रमाणे जि.प. हायस्कूल बेटमोगरा येथे केंद्र संचालक म्हणून मोरे.बी.एस, जिल्हा परिषद हायस्कूलमुलींचे मुखेड येथे कांबळे डी.जे, शाहीर अण्णाभाऊ साठे विद्यालय मुखेड येथे मास्टे बी.एस, गुरुदेवविद्यामंदिर माध्यमिक शाळा मुखेड येथे बालाजी पाळेकर, जि.प. माध्यमिक विद्यालय जाहूर येथे जी.के. कदम, नितीनिकेतन विद्यालय जांब बुद्रुक येथे संजय गोंड, सेवादास विद्यालय वसंतनगर येथे श्रीमती प्रेमलास्वामी, विद्या विकास विद्यालय बाहऱ्हाळी येथे पी.एस.मोरे, नरसिंह विद्यामंदिर उमरदरी येथे व्ही.टी. जाधव, पोस्ट बेसिक आश्रम शाळा चव्हाणवाडी बी. एन. पवार, विद्यावर्धिनी विद्यालय दापका गुंडोपंत येथे दीपकठाकूर, गंगाबाई मुलींचे हायस्कूल सावरगाव पीर येथे अभय कर्णावट, क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले विद्यालयराजुरा बु. येथे वाय.डी. भैरवाड, कै. डॉ. भाऊसाहेब देशमुख माध्यमिक विद्यालय मुक्रमाबाद येथे ए. आर. पंचगट्टे हे केंद्रसंचालक म्हणून काम पहाणार आहेत



