सहकारी शिक्षण पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी होणार- व्यंकट गंदपवाड

नांदेड प्रतिनिधी :- २६ सप्टेंबर
सहकारी शिक्षण पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या रविवारी श्रीकृष्ण मंगल कार्यालय नांदेड येथे संपन्न होणार आहे. या सर्वसाधारण सभेमध्ये ठेवलेले विषय सभासदांच्या व पतसंस्थेच्या हिताचे नसल्याने व तसेच सत्ताधारी संचालक मंडळाने केलेली नियमबाह्य कर्मचारी भरती सर्वसाधारण सभे पुर्वी गाजत आहे.यामुळे सभासदांचा प्रचंड रोष या सत्ताधारी संचालक मंडळावर आहे.याचे कारण असेही गेल्या अनेक वर्षापासून रिक्त जागा असताना. सत्ताधारी संचालक मंडळाने कर्मचारी भरती केली. पतसंस्थेमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असताना, पतसंस्था संगणकिकृत असताना भरती केली .भरतीमुळे सभासदांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. व तसेच या पतसंस्थेने सुरक्षा कवच योजना स्वतःपतसंस्थेची उभारलेली असताना, अपघात विमा योजना ही इतर विमा योजनेकडून घेऊन या पतसंस्थेला २८ लाखांचा भुर्दंड बसलेला आहे. याचे कारण असेही यादरम्यान तीन मयत सभासद होऊनही अद्यापपर्यंत त्यांना लाभ मिळालेला नाही. याच्यावरही कहर म्हणजे सत्ताधारी संचालक मंडळांनी या सभेमध्येआपल्या स्वतःची इमारत असताना दुसऱ्या रिकाम्या जागेवर बांधकाम करण्याचा ठराव विषयी सूचित त्यांनी ठेवलेला आहे व तसेच ही पतसंस्था स्वबळावर असताना अद्याप पर्यंत या पतसंस्थेने कुठल्याही बँकेकडून कर्ज घेतलेले नाही. परंतु या सत्ताधारी संचालक मंडळांनी दुसऱ्या बँकेकडून कर्ज घेण्यासाठी ववाढीव व्याजदराने कर्ज पुरवठा करण्यासाठी ठराव ठेवलेला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व सभासदांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. यासाठी शिक्षक परिषद व संघर्ष समितीने पतसंस्था विरोधात यापूर्वी जिल्हा उपनिबंधक कार्यालया समोर ढोल बजाव आंदोलन केलेले आहे व सहकार विभागाकडे या ठरावा संदर्भाततक्रारी केलेली आहेत .तरी होणारी सर्वसाधारण सभा सत्ताधारी संचालक मंडळांना जाब विचारणारीअसेल सभासदांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे व यासाठी महाराष्ट्र शिक्षक परिषद सत्ताधारी संचालक मंडळाला जाब विचारणार असे शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड यांनी स्पष्टकेले.
तरी जिल्ह्यातील सर्व सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिक्षक परिषदेचेराज्य संघटनमंत्री सुरेश दंडवते प्रांतप्रवक्ते दत्तप्रसाद पांडागळे विभागीय अध्यक्ष संजय कोठाळे विभागीय उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, अजित केंद्रे,विभागिय संघटक ग.नु.जाधव ,विभागीय कार्याध्यक्ष बालाजी बामणे जिल्हा नेते अशोक पाटील बावणे, दिगंबर पाटील कुरे, संभाजी आलेवाड,जिल्हाकार्यवाह प्रल्हाद राठोड,जिल्हा कोषाध्यक्ष धोंडीबा पांडागळे, जिल्हा कार्यालय मंत्री बळवंत मंगनाळे, जिल्हा प्रवक्ते रवीढगे,जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी पांपटवार ,नरसिंग एन्ड्रलवार, संघटन मंत्री संतोष साखरे, संतोष देशमुख, संजय मोरे प्रसिद्धी प्रमुख महेश पाटील विठ्ठल मुखेडकर आदींनी केले आहे.



