राजकीय

मुखेड शहरातील विविध समस्या मार्गी लागाव्यात या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन…

मुखेड प्रतिनिधी:- २० जुलै २५

भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी जाधव यांना मुखेड शहरातील विविध समस्यामार्गी लागाव्यात या मागणी करिता दिनांक १८ जुलै रोजी निवेदन देण्यात आलेयामध्ये १.शहरातघनकचरा टेंडर धारकाकडून शहर स्वच्छतेचे काम वेळेवर नियमित होत नसल्याने शहरातील प्रत्येकवार्डात सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा दिसुन येतो त्यामुळे दुर्गधी पसरुन नागरीकांचेआरोग्य धोक्यात येत आहे.

मुखेड शहरातील कब्रस्तान मध्ये पाण्याची  विदयुत दिव्याची सोय करावी.

३.शहर स्वच्छतेसाठी कार्यरत  सफाई कामगाराचे महिन्यातुन एकवेळा आरोग्य तपासणी करण्यात यावी 

४.मुख शहरात अस्तीत्वात असलेल्या मुताया नियमित स्वच्छ करावे

५.मुखेड शहरातील मुख्य बाजारपेठेत १० ते  या वेळेत अवजड वाहने ट्रान्सपोर्ट वाहनांना बंदी घालावी.

६. शहरातील आडवडी बाजार दिवसी नगर परिषदेचे फिरते शौचालय नागरीकांना उपलब्ध करुन देण्यातयावे.

६. मुखेड शहरातील मास विक्रेत्यासाठी नपा चे कत्तलखाना उपलब्ध करुन दयावे

७. मुखेड शहरात नगर परिषद कडून सार्वजनिक ठिकाणी तहसिल कार्यालया समोर  पोलीस चौकीजवळ फिल्टर पिण्याच्या पाण्याची नागरीकांसाठी व्यवस्था करावी

८. १५ ऑगस्ट रोजी शहरातील शाळकरी मुलांना नपा कडून खाऊ वाटप करण्यात येत होता ते बंद केलेलेखाऊ पुन्हा चालु करणे

९. जिल्हा परिषद हायस्कुल मुलीचे शाळेच्या तीन्ही बाजुने असलेल्या नाल्याची साफ सफाई करणे.

१०. मुखेड ते मुंबईपुणे  मुखेड ते नांदेड वाहतुक करणाया ट्रॅव्हल्स वाहने मुख्य रस्त्यावर दररोज थांबुनप्रवासी भरत असल्याने शहरातील पदचारी पायी चालणाया शाळकरी विदयार्थ्याना  वृध्द नागरीकांनाजिव मुठीत घेवुन चालावे लागत असल्याने या वाहनांची शहराच्या बाहेर पार्कीग करावी.यासारख्या असंख्य समस्या मार्गी लागाव्यात यासाठी शेकाप पक्षाने आपल्या निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्या कडे केल्या आहेत वरील मागण्या मान्य नाही झाल्यास  आंदोलन करण्यात येईल असा ही इशारा देण्यात आला आहे 

या वेळी शेकाप पक्षाचे भाई आसद बल्खी,भाई पांडुरंग लंगेवाड,मुजिप कुरेशी आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button