Uncategorized
गणेश नगर भागातील गादी घराला आग दहा लाखाचे नुकसान

नांदेड प्रतिनिधी
शहरातील गणेश नगर भागात शेख याकुब यांच्या असलेल्या पॅरामाउन्ट मॅट्रेस या गादि घराला दिनांक 12 नोव्हेंबर च्या रात्री ९:वाजता अचानक आग लागून आतील कुशन व लोकर चे सर्वच सामान जळून खाक झाले असून अंदाजे दहा लाखांची नुकसान झाल्याची घटना घडली आहे
सविस्तर वृत्त असे की शहरातील गणेश नगर भागामध्ये गादी घर असून या ठिकाणी विविध प्रकारच्या गाद्या बनवल्या जातात व त्याला लागणारे साहित्य या दुकानांमध्ये खरेदी करून ठेवण्यात आले होते परंतु रात्री अचानक आग लागल्यामुळे हे संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून सात ते दहा लाख रुपयांची नुकसान झाले दुकान मालक शेख याकुब यांनी सांगितले आहे



