Uncategorized

राहुल लोहबंदे मित्रमंडळाच्या वतीने संत गाडगेबाबा नगर मधील भटक्या, वंचितांना फटाके, मिठाई, शैक्षणिक साहित्य वाटप

मुखेड प्रतिनिधी:-
भारतात सर्व धर्मीय लोक हा सण आनंदात साजरा करतात. “दिवाळी” हा रोषणाई,उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि मानवतेने भरलेला उत्सव आहे. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप हा मांगल्याचे
प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या व सर्व
बंधु,भगिनिच्या जीवनात प्रकाश निर्माण होऊन यश
प्राप्ती व्हावी म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो त्या अनुषंगाने दि 14 नोव्हेंबर 2023 रोजी राहुल लोहबंदे मित्रमंडळाच्या संकल्पनेतून संत गाडगेबाबा नगर मधील भटक्या, वंचितांच्या जीवनात दीपोत्सवाचा आनंद पोहचवण्यासाठी दिपावली स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात फटाके, मिठाई, शैक्षणिक साहित्य वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आले.

यावेळी काँग्रेस प्रदेश सचिव डाॅ.श्रावण रॅपनवाड, माजी नगरसेवक राहूल लोहबंदे, पोलिस निरिक्षक रमेश वाघ,  शिवाजी गेडेवाड, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष संतोष बोनलेवाड, शिवसेना तालुकाप्रमुख नागनाथ लोखंडे, युवक काँग्रेस जिल्हा सरचिटणिस विशाल गायकवाड, दयानंद  यरपुरवाड, शेख इस्माईल बागवान, शहराध्यक्ष अदनान पाशा, हणमंत अण्णा तमशट्टे, , बाबु बागवान, रियाज शेख, सह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button