रिंदाच्या नावावर खंडणी मागणाऱ्या दोघांना ग्रामीण पोलिसांनी केले गजाआड

नांदेड प्रतिनिधी:-
शहरातील कवठा भागातील ब्युटी पार्लरच्या एका व्यवसायिकांना वेगवेगळ्या तीन मोबाईल क्रमांकावरून कॉल करून रिं दाच्या नाव घेऊन आज रात्रीला नऊ वाजेपर्यंत पाच लाख रुपये तयार ठेवा अन्यथा तुमचा मुलाचा गेम करतो असा फोन करून धमकी देणाऱ्या दोघा जणांना ग्रामीण पोलीसानी बेड्या ठोकून गजाआड केले आहे
सविस्तर वर्त असे की शहरालगतअसलेल्या कवठा भागातील एका ब्युटी पार्लर व्यवसायिकांना दोघाजणांनी वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून कॉल करून रिंदाचे नाव घेऊन आम्हाला त्वरित पाच लाख रुपये द्या अन्यथा तुमच्या मुलाचे तुकडे करून टाकीन अशी धमकी देऊन खंडणीची मागणी करत होते याबाबतची ब्युटी पार्लर व्यावसायिक यांनी त्वरित नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनला संपर्क करून हे सर्व हकीगत सांगितली त्यावरून ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन कारवाई सुरू केली त्यावरून ग्रामीण पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून येणाऱ्या मोबाईल नंबर शोध घेऊन त्याची माहिती घेतली त्यावरून या गुन्ह्यातील अमित अनिल सवामचल रा. वाल्मिकी नगर नांदेड व जसप्रीतसिंग प्रतापसिंग मठाळू रा. गुरुद्वारा गेट नंबर एक नांदेड या दोघांनी रिंदा च्या नावावर खंडणी मागल्याचे सिद्ध झाल्यावर या दोघांना त्वरित अटक करून गजाआड केले व त्याची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटेअप्पर पोलीस अधीक्षक आबिनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक भोकर खंडेराय धरणे उपविभागीय पोलीस अधिकारी इतवारा सुशील कुमार नायक पोलीस निरीक्षक जगदीश भंडारवार स्थानिक पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप व पोलीस उपनिरीक्षक बाबुराव चव्हाण यांनीही कारवाई केली असून आरोपीला अटक केली आहे



