Uncategorized

ट्रेनमध्ये ज्वलनशील पदार्थ नेण्यास आहे सक्त मनाई, पकडल्यास होऊ शकते तीन वर्षांची शिक्षा:- नीती सरकार

नांदेड प्रतिनिधी
रेल्वे व स्टेशन परिसरामध्ये प्रवास करताना कुठल्याही प्रकारचे ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्यास सक्त मनाई असून ते आढळून आले असता कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दक्षिण मध्ये रेल्वेच्या नांदेड विभागाच्या रेल्वे प्रबंधक अधिकारी नीती सरकार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे मागील रेल्वेच्या झालेल्या दुर्घटनेची चौकशी केली असता त्यामध्ये प्रामुख्याने बीडी. सिगारेट यांच्यामुळे रेल्वेच्या बोगीला आग लागून दुर्घटना घडली आहे रेल्वे स्टेशन परिसर व रेल्वेमध्ये ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्यास बंदी आहे त्यामुळे काही प्रवासी हे रेल्वेमध्ये धूम्रपान करतात बीडी. सिगारेट ओढतात आणि त्यामुळेच हे दुर्घटना घडतात म्हणून रेल्वे प्रशासनाने यावर बंदी घालण्यासाठी पाऊले उचलून खडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे रेल्वे प्रवास करताना कुणीही ह्या गोष्टी वापरू नये . ते आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करून एक हजार रुपये दंड व तीन वर्षांची शिक्षा भोगावे लागणार आहे म्हणून रेल्वे प्रवास करताना कुठल्याही प्रकारचे ज्वलनशील पदार्थ रेल्वेत व टेशन परिसरामध्ये घेऊन जाण्यात सक्त मनाई आहे हे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा रेल्वे विभागाच्या महाप्रबंधक नीती सरकार यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button