मुखेड नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी प्रियंका टोंगे रुजू

मुखेड : लोहा नगर परिषद येथे मुख्याधिकारी पदावर कार्यरत असलेल्या कर्तव्यदक्ष अधिकारी प्रियंका टोंगे ह्या मुखेड नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी म्हणुन दि.२१ नोव्हेंबर रोजी रूजू झाल्या आहेत. त्यांचा न.प. कार्यालयाच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सत्कार केले. मुख्याधिकारी प्रियंका टोंगे ह्या याअगोदर नांदेड जिल्ह्यातील भोकर नगर परिषद येथे तीन वर्ष मुख्याधिकारी म्हणून सेवा बजावली आहे त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन महिने जिल्हा सह आयुक्त म्हणून काम पाहिले आहेत. नांदेड येथून त्यांची बद्दली लोहा नगर परिषद कार्यालय येथे झाली त्या मागील दोन महिण्यापासुन लोहा येथे मुख्याधिकारी म्हणून काम पाहत आहेत. नुकतच तत्कालीन मुख्याधिकारी विजयकुमार पाटे यांची मुदखेड येथे बदली झाल्यामुळे त्याठिकाणी दि.२१ नोव्हेंबर पासुन प्रियंका टोंगे हया मुखेड नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी म्हणून रूजू झाल्या आहेत. मुख्याधिकारी पदी रुजू होताच नगर परिषदेच्या वतीने अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत करुन सत्कार केले.



