Uncategorized

अनधिकृत फेरी वाल्या विरोधात नांदेड दक्षिण मध्य रेल्वेची मोठी कार्यवाही

नांदेड प्रतिनिधी:-  अनधिकृत फेरी वाल्या विरोधात दक्षिण मध्य रेल्वे कडून तपासणी मोहीम सुरू करण्यात येऊन ६१ अनधिकृत फेरी वाल्यांवर कार्यवाही करण्यात आली आणि २१ हजार ५० रुपये दंड करण्यात आला.
 नांदेड दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने २१ आणि २२ नोव्हेंबेर रोजी नागेंद्र प्रसाद, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड यांच्या देखरेखीखाली अनधिकृत फेरी वाल्या विरोधात मोठी तपासणी मोहीम हाती घेण्यात  आली होती. यात २१ नोव्हेंबर रोजी नांदेड विभागात धावणाऱ्या विविध रेल्वे गाड्या तपासण्यात आल्या. या तपासणी मोहिमेत नागेंद्र प्रसाद, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, नांदेड यांच्या सह ४ तिकीट तपासनि पथक सहभागी झाले होते.  यात ५४ अनधिकृत फेरी वाल्या विरोधात कार्यवाही करण्यात आली आणि २१ हजार ५० रुपये दंड वसूल करण्यात आला. 
 २२ नोव्हेंबर रोजी नांदेड रेल्वे स्थानकावर सचखंड एक्सप्रेस मध्ये ७ अनधिकृत फेरी वाल्या विरोधात कार्यवाही करण्यात येऊन २१ हजार ५० रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रवाशांनी अनधिकृत फेरी वाल्यांकडून कोणतेही पदार्थ घेवू नयेत असे आवाहन नीति सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी यावेळी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button