Uncategorized

शेतकरी व कुरेशी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात मुखेड तहसीलवर आंदोलन 

मुखेड / प्रतिनिधी ०१ ऑगस्ट २५

      शेतकरी  कुरेशी समाजाच्या पारंपरिक व्यवसायात खंडणीखोर गावगुंड अडथळे निर्माण करीतआहेतस्वंयघोषित समाजकंटकाकडून होत असलेली अडवणूक  कायदा हातात घेत होणारी लुटमार ताबडतोब बंद करावीकुरेशी समाजावरील अन्याया विरोधात समाजाने जनावरे खरेदी– विक्री बेमुदत बंद आंदोलन सुरु केले असून विविध मागण्यांसाठी मुखेड येथे शेतकरी बांधव  कुरेश काॅन्फ्रन्स मुखेडच्यावतीने तहसील कार्यालयात गुरुवार (दि.३१दुपारी बारा वाजता आंदोलन करण्यात आलेयावेळीशासनाकडून मुद्दाम अल्पसंख्याक समाजाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करण्यात आला.  शेतकरीव्यापाऱ्यांच्या विरोधात शासन काम करत आहेत्याविरुद्ध संघटितपणे लोकशाही मार्गाने लढाउभारण्याचा निर्धार उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केलायावेळी तहसीलदार राजेश जाधव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आलेया धरणे आंदोलनात हाफिज अब्दुल गफार,शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलंबरकरशेतकरी कार्यकर्ते सुभाष पा.गवते, माजी नगरसेवक नासरखा पठाण,युवा नेते खाजा धुंदी,शोकत होंनवडजकर,अब्दुल सय्यद,बबलू मुल्ला ,कुरेश काॅन्फ्रन्स जिल्हा सदस्य हसन खुदाबक्श कुरेशीतालुकाध्यक्ष शफी कुरेशीशहराध्यक्ष ईमरान मौलाना कुरेशीतालुका उपाध्यक्ष मुजीब ताहेर कुरेशीशहर उपाध्यक्ष गफार मदारसाब कुरेशी यांच्यासह मुखेडमुक्रमाबादबेटमोगरासावरगावजांबआंबुलगाबाऱ्हाळी सह तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button