Uncategorized

मुक्रमाबाद येथील आरोग्य कर्मचा-यावर आली उपासमारीची वेळ;सात महीण्याचे मानधन रखडले


मुक्रमाबाद (प्रतिनिधी )
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सर्व बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मार्च २०२४ पासुनचे मानधन मिळाले नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमाराची वेळ आली आहे. गेल्या अनेक महिन्यापासून त्यांना त्यांच्या मानधनापासुन पासून वंचित ठेवण्यात आले आहे. यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी निवेदने व वरिष्ठ स्तरावर मागणी करून देखील आजपर्यंत त्यांचे मानधन मिळाले नसल्यामुळे त्यांच्यावर कुठेतरी उपासमाराची वेळ आली असेच म्हणावे लागेल. तसेच त्यांचे रिनीवल देखील करण्यात आले नाही.संबंधित प्रशासणाचे याकडे सर्रास दुर्लक्ष झाले आहे.यामुळे सर्व कर्मचारी हे आक्रमक भूमिकेत दिसून येत आहेत. आपले मानधन मिळावे यासाठी आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी मुक्रमाबाद वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नांदेड जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प. नांदेड, तालुका आरोग्य अधिकारी, ता. आ. अ. कार्यालय, मुखेड,ट्रेझरी ऑफिस, नांदेड यांना दि.1 आॕक्टोंबर पासुन काम बंद करण्याचे निवेदन देण्यात आले. आहे. यावेळी गजानन दनात्रय धुमाळे (प्रयोगशाळा तंत्रज्ञ) अमोल शिवाजीराव मोरे (औषधनिर्माण अधिकारी)समीर एम. सय्यद (वाहन चालक) राजू एम. वडजे (परिचर ) लतीफ ए. शेख – (परिचर)ज्योती डि. देवकांबळे (परिचर) यांची उपस्थित होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button