Uncategorized

मुखेड ‘आमदार चषक’ क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; अंतिम फेरीत सोहेल इलेव्हन मुखेडने मारली बाजी

मुखेड प्रतिनिधी :- आसद बल्खी

 मुखेड येथे आयोजित केलेल्या आमदार चषक 2023 क्रिकेट स्पर्धेतील छत्रपती वारीयर्स हिंगोली विरुद्धच्या लढतीत सोहेल इलेव्हन मुखेडने विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, या स्पर्धेत परिसरातील एकूण 50 क्रिकेट संघांनी सहभाग नोंदवला.

भाजपा आमदार यांच्या समर्थकांनी मुखेड परिसरातील आमदार चषक  टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. गंगाधर राठोड मित्र मंडळ व सोमनाथ बंडे मित्र मंडळ यांनी स्पर्धेच्या आयोजनात पुढाकार घेतला.

अंतिम सामन्यात सोहेल इलेव्हन मुखेड आणि छत्रपती वारीयर्स हिंगोली मध्ये रंगतदार लढत झाली. यामध्ये सोहेल इलेव्हन मुखेडने विजय मिळवला. छत्रपती वारीयर्स हिंगोली ला उपविजेतेपद, तर सरपंच इलेव्हन बिजेवाडी तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले. तर चौथ्या क्रमांकावर आवेज इलेव्हन औरंगाबादला समाधान पत्करावे लागले तर पाचव्या क्रमांकावर अक्की इलेव्हन मुखेड अंतिम सामना पाहण्यासाठी डॉ विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, आमदार तुषार राठोड व त्याचे बंधु गंगाधर राठोड , पोलिस निरीक्षक रमेश वाघ, सय्यद एफ.एम,खुशाल पाटील उमरदरीकर ,अशोक गजलवाड,लक्ष्मण पाटील खैरकेकर जगदीश बियाणी ,शिवकुमार बंडे, सोमनाथ बंडे,मुजीप धुंदी, आकाश दरेगावे,बाबु बागवान,राजु  गजलवाड,नागेश  गोविंदवाड, जायका बिर्याणी हॉटेलचे मालक गौस मिर्झा,प्रकाश पा शुभंजे, बजरंग कल्याणी,मिलिंद लोहबंदे, चिंटू सोनकांबळे, विकास कासले,गजु लोखंडे,संदिप वी. ढगे,धनंजय मुखेडकर, किशोरसिंह चव्हाण, सुधीर चव्हाण, प्रीतम,गजानन दंडलवाड,राहुल पाटील, सुरज अटके, गजानन इंगळे,शौकत होनवडकर,बबन ठाकूर, हारून होनवडकर,करण रोडगे, शुभम पाटील बेटमोगरेकर, हनुमंत तमशट्टे असंख्य क्रिकेट प्रेमी उस्थित होते.

परिसरातील सोमनाथ बंडे मित्र मंडळ सहभागामुळे अतिशय शिस्तबद्ध व नियोजन करून ही स्पर्धा पार पडली. गेले १२ दिवसांपासून या स्पर्धा सुरू होत्या. अतिशय चुरशीची झालेली फायनल स्पर्धा पाण्यासाठी सुमारे ७ हजार लोकांनी क्रिकेटप्रेमींनी उपस्थिती दर्शवली.तर श्री लाइव्ह युट्युब वर असंख्य दर्शकांनी घर बसल्या या अंतिम सामन्याचा आनंद घेतला

आमदार चषक-२०२३ स्पर्धेकरिता आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली. पहिल्या क्रमांकसाठी १लाख ५१ हजार रुपये रोख, द्वितीय क्रमांकासाठी १ लाख १ हजार रोख, तृतीय क्रमांकासाठी ६६ हजार ६६६ रोख, चतुर्थ क्रमांसाठी ३३ हजार ३३३ रोख, पाचव्या क्रमांसाठी २२ हजार २२२ रोख, अशी प्रमुख बक्षीसे देण्यात आली. यासह सलग तीन विकेट, सलग तीन चौकार, सलग तीन षटकार, उत्कृष्ट झेल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज अशा गुणवंत खेळाडुंनाही रोख स्वरुपात बक्षीसे देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button