Uncategorized

शाहीर अण्णा भाऊ साठे महाविद्यालयात संविधान दिन साजरा


मुखेड प्रतिनिधी:-

शाहीर अण्णा भाऊ साठे महाविद्यालय मुखेड येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने दिनाक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी संविधान दिन निमित्त लोकशाहीचा आधार भारतीय संविधान या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली ,यात १६ जनांनी सहभाग घेतला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे रा से यो कार्यक्रमाधिकारी प्रा संजीव डोईबळे व पोलिस पाटील अटाळकर यांनी पुष्पहार अर्पण केले.
याप्रसंगी कु स्वामी भाग्यश्री हिने भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन करून उपस्थितांना शपथ दिली.
भारतीय संविधान या वर उपप्राचार्य
प्रा संजीव डोईबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी 26 नोव्हेंबर रोजी शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
सदरील कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु सुडके वैष्णवी हिने केले तर आभार कु रवीता गवाणकर हिने मानले.
सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राम जमजाळ ,ग्रंथालय विभागातील संजय सकनुरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button