आरोग्य

उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा; रुग्णच आणतात बाहेरून औषधे.

मुखेड प्रतिनिधी:- ०८ जुलै २०२५

उपजिल्हा रुग्णालय येथे दिवसभरात शंभर ते दीडशे बाह्य रुग्ण ओपीडी होत आहेग्रामीण भागातीलगोरगरीब रुग्णदारिद्र्यरेषेखालील नागरिकांची उपचार घेण्यासाठी गर्दी असतेमात्ररुग्णालयातीलऔषध वाटप विभागात NS आयपी स्लाईन , मेट्रोनिडाझोल इंजेक्शन ip ,औषधांचा  आमलपित्ताच्याइंजेक्शन साठा संपला असल्याने गरीब रुग्णांना स्वत: बाहेरून औषधे खरेदी करावी लागत आहेत

त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत असून, शासनाने व लोकप्रतिनिधीने विशेष लक्ष देत औषधी तत्काळ उपलब्ध करून द्यावीअशी मागणी रुग्णांन कडून व जनतेतून केली जात  आहे

गरीब रुग्णांचा आधार असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात चांगली सुविधा मिळावीया आशेने आलेल्यारुग्णांना इतर काही औषंधांसह आवश्यक असल्यास इंजेक्शनची सिरिंज  सुईही बाहेरूनही खरेदीकरून आणावी लागतेचांगली सुविधा मिळावी म्हणून रुग्णही प्रतिप्रश्न  करता निमूटपणे सहन करतातअशी कैफियत काही रुग्णांंनी ‘श्रमिक एकता न्यूज़ शी बोलताना मांडली

रुग्ण महागड्या वैद्यकीय सेवांमुळे मोफत चांगली सुविधा मिळणार या आशेने शासकीय उपजिल्हा रुग्णालयांकडे ग्रामस्थांचा कल वाढत आहेपरिणामी औषधांची मागणी देखील वाढत आहेयारुग्णालयांना जिल्हा औषध भांडार  ग्रामीण रुग्णालयाला रुग्ण कल्याण समितीच्या मार्गदर्शनाखालीऔषधे खरेदी करण्याचे अधिकार आहेतत्यानुसार औषधांचा तसेचसिरिंजचा तुटवडा निर्माण झाल्यासही खरेदी करता येतेपरंतुकाही ग्रामीण रुग्णालय व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केल्याची माहितीविश्वसनिय सुत्रांनी दिलीरुग्ण दवाखान्यात आल्यानंतर प्रथम केसपेपर काढतोवैद्यकीय अधिकाºयानेतपासल्यानंतर काही रुग्णांना इंजेक्शन देण्याचे सांगितले जातेहा रुग्ण इंजेक्शन घेण्यासाठी गेल्यानंतरत्याला बाहेरून सिरिंज (सुई)  खोकल्याचे औषधआमलपित्ताच्या  इंजेक्शन ,NS आयपी स्लाईन ,मेट्रोनिडाझोल इंजेक्शन ip  विकत आणायला सांगितले जातेसेवा चांगली मिळावीया आशेने रुग्णहीप्रतिप्रश्न  करता निमूटपणे हे सर्व सहन करतो.

रुग्णांना बाहेरूनच इंजेक्शन आणण्याचे सांगितले जात आहेहा रोजचा नित्याचाच प्रकार असल्याचेकाही कर्मचारी खासगीत सांगतातमात्रउघडपणे बोलेले तर वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागेल या भितीने बोलत नाहीत.

पावसाळ्यामुळे  वातावरणाच्या बदलामुळे तापाने फणफणलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असूनरुग्णांची तपासणी किंवा दाखल केल्यानंतर डेंग्यूची तपासणी करण्यासाठी डॉक्टर सांगतातमात्ररुग्णालयात डेंग्यू सदृश आजाराची तपासणी देखील होत नसल्याने रुग्णांना खासगी रक्त तपासणी लॅबमधून जवळपास ९०० ते १००० रुपये खर्च करून तपासणी करून घ्यावी लागत आहे

ग्रामीण भागातील गरीब नागरिकांच्या आर्थिक अडचणीत भर पडली असूनया रुग्णालयात येणारे रुग्णहे गरीब कुटुंबातील असतातरुग्णालयात औषध उपलब्ध होत नसल्याने गरीबगरजू रुग्णाची गैरसोय होत आहे.

 औषध खासगी मेडिकलमधून घेणेही परवडत नाही त्यामुळे औषधी तत्काळ उपलब्ध करून द्यावीअशीमागणी रुग्णांन व जनतेकडून केली जात आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button