Uncategorized

भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे गुरूवारी मुखेड दौऱ्यावर

मुखेड : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पाटीचे महाराष्ट्र प्रदे- श अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे २१ रोजी मुखेड येथे येणार आहेत.

नदिड लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघाच्या सुपर वॉरियर्सची बैठक मुखेड येथे पार पडणार आहे. देगलूर विधानसभा, नायगाव विधानसभा व मुखेड विधानसभेतील प्रत्येकी १०० सुपर वॉरियर्स व नांदेड लोकसभा व या तीन विधानसभेतील प्रमुख पदाधिकारी सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीला समोर ठेवून भारतीय जनता पाटीर्ने प्रत्येक विधानसभेत शंभर सुपर वॉरिअर्स नव्याने निर्माण केले आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीनिमित्ताने या तीन विधानसभेतील सुपरवायर्सशी संवाद साधतील. शहरातील कै. गोविंदराव राठोड बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृहात या बैठकीचे आयोजन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button