अशोक नेम्मानिवार यांची प्रदेश कार्यकारिणीवर नियुक्ती

नांदेड – जिल्ह्यासह तेलंगणा राज्यातील ग्रामीण भागामध्ये प्रचंड जनसंपर्क असलेले अशोक नेम्मानिवार यांची भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीवर सदस्य म्हणून नियुक्ती केली असून त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
नांदेड जिल्ह्यासह तेलंगणा राज्यातील ३२ विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अशोक नेम्मानिवार यांनी उपेक्षित, वंचित, आदिवासी समाजाच्या मूलभूत समस्यांची सोडवणूक करण्याचे आणि भारतीय जनता पार्टीला सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे. त्यांच्या या संघटनात्मक कार्याची दखल घेवून भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीवर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकर, नांदेड जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, संध्या राठोड, डॉ. किरण पाटील, माधवराव पाटील किन्हाळकर यांच्यासह पक्षातील सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून अभिनंदन केले असून त्यांच्यावर शुभेक्षांचा वर्षाव होत आहे.



