वैद्यकीय संस्था मुखेड च्या तालुकाध्यक्ष पदी डाॅ.रामराव श्रीरामे तर आय.एम.ए. च्या तालुकाअध्यक्ष पदी डॉ. अशोक कौरवार यांची निवड.

मुखेड/प्रतिनिधी
मुखेड येथील शिवप्रसाद नर्सिंग व फाॅर्मसी काॅलेज येथे दि.१९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध सर्पदंश चिकित्सक डाॅ.दिलीप पुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व डाॅ.विरभद्र हिमगिरे यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यकीय संस्था व इंडियन मेडिकल असोशिएशनच्या मागिल पदाधिका-यांचा कार्यकाल संपल्यामुळे घेण्यात आलेल्या बैठकित वैद्यकीय संस्था मुखेड च्या तालुकाध्यक्ष पदी डाॅ.रामराव श्रीरामे तर सचिवपदी डाॅ. श्रीहरी बुडगेमवार यांची तर इंडियन मेडिकल असोसिएशन च्या तालुका अध्यक्षपदी डाॅ.अशोक कौरवार तर सचिवपदी डाॅ. कैलास पाटील चांडोळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मुखेड वैद्यकीय संस्थेची स्थापना १९९३ साली
झाली. यास ३० वर्ष पुर्ण झाली आहेत.ही संस्था मागील ३० वर्षात आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक ,सांस्कृतिक व राष्ट्रिय आणि आपत्कालिन आदी क्षेञात उल्लेखनीय काम करणारी संस्था म्हणून नावारूपाला आली आहे. यावेळी मावळते अध्यक्ष डाॅ.राहुल मुक्कावार व सचिव डाॅ.पांडुरंग श्रीरामे व आय.एम.ए.चे अध्यक्ष डाॅ.व्यंकट सुभेदार यांचा सत्कार करुन निरोप देण्यात आला.यावेळी वैद्यकीय संस्थेचे सचिव डॉ.पांडुरंग श्रीरामे यांनी ,२०२१-२०२३ मधिल कार्यकारिणिच्या कार्याचा अहवालाचे दृकश्राव्य माध्यमातून सांगितला. याचवेळी नुतन कार्यकारनी जाहिर करुन नविन कार्यकारनिला शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी डाॅ.एम.जे.इंगोले,डाॅ.आर.जी.स्वामी,डाॅ.पि.बी.सितानगरे,डाॅ.व्यंकट सुभेदार ,डाॅ.राहुल मुक्कावार ,डाॅ.नामदेव नरवाडे,डाॅ.प्रशांत खंडागळे,डाॅ.पांडुरंग श्रीरामे, डाॅ.अविनाश पाळेकर,डाॅ.सतिश धमने,डाॅ.प्रकाश पांचाळ,डाॅ.गजानन मोरे,
डाॅ.शारदा हिमगिरे,डाॅ.माधवी सुभेदार, डाॅ.आरती पाटिल,डाॅ.किरण ठाकरे, डाॅ.संदीप ढगे,डाॅ.उमेश पाटील,डाॅ.पृश्विदास पत्की,डाॅ.माधव पाटिल,डाॅ.शिवसांब वडेर,डाॅ.फारुख शेख,डाॅ.निळकंठे,डाॅ.प्रल्हाद नारलावर, डाॅ.शैलेश कवटिकवार सह डाॅक्टर उपस्थित होते.



