क्राईम

मुखेडमध्ये अल्पवयीन मुले अंमली पदार्थांच्या विळख्यात; वारंवार तक्रारींनंतरही प्रशासन ‘निद्रावस्थेत’!

मुखेड (प्रतिनिधी): श्रमिक एकता न्यूज़ १६ एप्रिल २६

मुखेड शहरात सध्या अंमली पदार्थांचा, विशेषतः गांजाचा विळखा घट्ट होत चालला असून, शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. या गंभीर विषयावर स्थानिक माध्यमांनी वारंवार आवाज उठवून आणि बातम्या प्रसिद्ध करूनही, संबंधित प्रशासन आणि पोलीस विभाग अद्याप ढिम्म असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

शहरातील काही निर्जन स्थळे, अर्धवट बांधलेली घरे आणि सार्वजनिक बागा,स्मारक परिसर आताव्यसनी टोळ्यांचे अड्डे बनत चालले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, १० ते १६ वयोगटातील मुले याव्यसनाच्या आहारी जात आहेत. शहरात गांजा येतो कुठून? आणि तो या लहान मुलांपर्यंत पोहोचवणारे मुख्य सूत्रधार कोण? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

अंमली पदार्थ विक्रेते जाणीवपूर्वक शाळेतील आणि कॉलेजमधील मुलांना जाळ्यात ओढत आहेत.

अनेक वेळा बातम्या प्रसिद्ध होऊनही पोलिसांनी अद्याप एकही मोठी ठोस कारवाई केलेली नाही.

आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल पालकांमध्ये प्रचंड भीती आणि असुरक्षिततेची भावना आहे.

प्रशासनाला जाग येण्यासाठी अजून किती मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वाट पाहिली जात आहे? ‘अंमली पदार्थ मुक्त मुखेड‘च्या केवळ घोषणाच होणार की प्रत्यक्ष कारवाई? असे तिखट प्रश्न नागरिक विचारत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button