Uncategorized

राशनचा तांदुळ काळ्या बाजारात नेणारा ट्रक पोलिसानी पकडला

नांदेड प्रतिनिधी:- मो. रफीक शेख


नांदेड- पोलीस अधिक्षकांचे विशेष पथकास गुप्त मिळालेल्या माहितीवरुन रामतीर्थ पोलिस ठाण्यांतर्गत एक ट्रक थांबवून चौकशी केली असता त्यात १७ टन राशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी रामतीर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून २६ लाख २० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत जिवनावश्यक वस्तु कायद्यानुसार कार्यवाही करण्याबाबत विशेष पथकांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत विशेष पथकातील पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार हे अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरीता गस्तीवर असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकरनगर रोडवरून एक आयचर ट्रक क्रमांक एमएच-२६ बीई ७०१२ मध्ये संशयीत राशनचा तांदळाचे कट्टे घेऊन जात आहे. त्यावेळी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचून विशेष पथकाने सदरचा ट्रक थांबवून चौकशी केली असता आत १७ टन तांदुळ किंमती ४ लाख २० हजार रुपयाचा व आयचर वाहनाची किंमती २२ लाख रुपये असा एकुण २६ लाख २० हजार रुपयाचा संशयीत माल मिळून आल्याने ट्रक चालकास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन रामतिर्थ यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर प्रकरणी पुरवठा विभागास पत्रव्यवहार करून अहवाल प्राप्त करून पुढील कार्यवाही करण्याची तजविज ठेवली आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, स्थागुशाचे पोनि. उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील व्ही.एस. आरसेवार, सपोनि., पोहेकों बालाजी पोतदार, सोनबा मुंडकर, पोना. कृष्णा तलवारे, पोकों. नारायण येंगाले, अनिल वाघमारे यांनी पार पाडुन चांगली कामगीरी केली आहे. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button