अपघात केल्यास १० वर्ष शिक्षा ७ लाख दंड शिक्षेच्या कायद्याविरुद्ध चक्काजाम; मुखेड महामार्गावर रास्ता रोको

मुखेड प्रतिनिधी:-
रस्त्यावर वाहन चालकांकडून अपघात झाल्यास १० वर्षाची शिक्षा सुनावण्याचे आदेश केंद्र सरकारने अमलात आणला आहे. या विरोधात ट्रक चालक व मालक संघटना आक्रमक झाले असून आज दि ०३ जानेवारी रोजी ११ वाजता तहसील कार्यलया समोर लगत महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
केंद्र शासनाने हिट अँड रन कायदा विरोधात महामार्गावर ट्रक चालकांनी रास्ता रोको आंदोलन केले. रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर सुमारे एक किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सरकारी नियमाचा विरोध करत हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असून तात्काळ सरकारी नियम मागे घ्यावा; अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे.
केंद्र शासनाने हिट अँड रन कायदा करून रस्ते अपघातातील मृत्यु संदर्भात सर्वस्वी जबाबदार चालकास (ड्रायव्हर) दोषी धरून १० वर्ष सजा व ७ लाख रुपये दंड अजामीनपात्र गुन्हा घोषीत केला याच्या निषेधार्य आज मुखेड येथे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गेडेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चालक मालक संघटनेच्या वतीने रास्तारोको चक्काजाम आंदोलन करून ताहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना जिल्हा समन्वयक दशरथ लोहबंदे, काँग्रेसचे राज्य सरचिटणीस डाॕ. श्रावण रॅपनवाड, शिवसेना तालुका प्रमुख नागनाथ लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गेडेवाड, शिवसेना शहर प्रमुख शंकर चिंतमवाड, राजमुद्रा ग्रुपचे सचिन पाटील इंगोले, बालाजी पाटील वडजे, पत्रकर रियाज शेख ,गंगाधर पा.येवते,नरेश नाईनवाड,राजु.पा.दापशेटकर,मिथुन झांगडे,हाणमंत लुट्टे, बबलू शेख यांच्यासह वाहतूक चालक व मालक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि चालक उपस्थित होते.



