गंगाधर गच्चे व मिर्झा बेग यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान

नांदेड प्रतिनिधी
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार हा अतिशय महत्वाचा घटक असून समाज व शासनाच्या मध्येअ काम करणारा एक दुवा आहे लेखणीच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देऊन दर्जेदार लेखणी चालवणारे पत्रकार गंगाधर गच्चे व मिर्झा बेग यांना नुकताच बाळशास्त्री जांभेकर दर्पण दिनानिमित्त आयोजित केलेल्या नियोजन भवन येथे दर्पण दिन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला
मागील दहा वर्षापासून पत्रकारितेमध्ये आपली लेखणी चालून जनसामान्यांना न्याय देण्याचे काम या पत्रकारांनी केला आहे कुठेतरी कौतुकाची स्थाप पाठीवर पडावी व शाब्बासकी मिळावी यासाठी पत्रकार अहोरात्र धडपडत असतात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रात्री बे रात्री बातमीचा शोध घेऊन बातमी प्रसारित करतात व समाजाला व शासनाला योग्य दिशा देण्याचे काम या लेखणीच्या माध्यमातून केलं जातं बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पणकार वृत्तपत्र सुरू करून समाज जागृती केली होती याचा भाग म्हणून आज दि. 6 जानेवारी रोजी संपूर्ण देशामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पणकार दिन म्हणून साजरा केला जातो त्या अनुषंगाने दि. 6 जानेवारी रोजी जिल्हा माहिती कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस प्रशासन यांच्या वतीने नियोजन भवन येथे दर्पण दिन साजरा करण्यात आला या दिनामध्ये नांदेड जिल्ह्यातील पत्रकार गंगाधर गच्चे व मिर्झा बेग यांना बहुभाषिक पत्रकार संघटना महाराष्ट्र चे वतीने आदर्श पत्रकार पुरस्कार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार अहमदभाईकरखेलीकर आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील सर्वच पत्रकार. अधिकारी कर्मचारी उपस्थित होते हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मित्रपरिवार व नातेवाईकातून या दोन्ही पत्रकारांचे कौतुक होताना दिसत आहे



