Uncategorized

महाराष्ट्र ग्राहक पंचायत संघटनेची मुखेड कार्यकारणी जाहीर.

मुखेड / प्रतिनिधी

महाराष्ट्र ग्राहक पंचायत संघटनेची मुखेड तालुका नुतन कार्यकारणी निवड करण्यासाठी  शहरातील चौव्हाण यांचे नेहरू वस्तिगृह दत्तनगर येथे दि.०६ जानेवारी रोजी ग्राहक पंचायतचे जिल्हा सचिव अशोक बच्चेवार यांच्या अध्यक्षतेखाली व माजी अध्यक्ष बालाजी वाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली यात तालुकाध्यक्षपदी खाजा धुंदी तर सचिवपदी ज्ञानेश्वर डोईजड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. 
 मुखेड ग्राहक पंचायत संघटनेचे विद्यमान अध्यक्ष बालाजी वाडेकर यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे नुतन अध्यक्ष व कार्यकारणीची निवड करण्यासाठी मुखेड येथे बैठक घेण्यात आली यात मुखेड तालुकाध्यक्षपदी खाजा धुंदी तर सचिवपदी ज्ञानेश्वर डोईजड,  कार्याध्यक्षपदी रामेश्वर पाटील इंगोले, उपाध्यक्षपदी महेताब शेख, संघटकपदी प्रा.आखील येवतीकर, कोषाध्यक्षपदी सतिषसिंह चौ्हान, सहसचिवपदी संजय कांबळे, समन्वयकपदी डॉ.बालाजी गुडमेवाड, सल्लागार बालाजी वाडेकर, कायदेविषयक सल्लागार अॅड दत्ता हाके, कार्यकारणी सदस्य सुनिल मुक्कावार, प्रसिद्धिप्रमुख अॅड मिलिंद कांबळे, सदस्य देविदास भुरेवार, सदस्य गजानन अक्कुलवाड, सदस्य शिवतेज बच्चेवार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्राहकाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी कटीबध्द असल्याचे नुतन अध्यक्ष व  कार्यकरणीतील सर्व पदाधिका-ऱ्यांनी निवडिनंतर बोलताना सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button