Uncategorized

शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने महिला शिक्षिका,विषय शिक्षकांचे सत्कार.

मुखेड / प्रतिनिधी

  जागतिक महिला दिनाचे अवचित्य साधुन मुखेड शहरातिल आदर्श शाळा म्हणुन जिल्ह्यात  परिचित असलेली पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल मुलींचे मुखेड प्रशालेतील सर्व महिला शिक्षिका,सेविका,शालेय पोषण आहाराचे काम करणाऱ्या मदतनीस यांचा लेखणी व पुष्पहार भेट देवून यथोचित सत्कार करण्यात आला तसेच पदोन्नती होवुन विषय शिक्षक म्हणुन जि.प.मुलिंचे हायस्कूल प्रशालेत रूजु झालेल्या शिक्षक बंधुचे दि.१२ मार्च रोजी शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने सन्मान करण्यात आले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेताब शेख, मुख्याध्यापक एम.आर.कांबळे, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य नंदकुमार काचावार,  संजय यलमवाड,अनिल वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मुख्याध्यापक एम.आर. कांबळे, अध्यक्ष महेताब शेख, सहशिक्षिका मधुमती लोणीकर, विषय शिक्षक डावकरे, गोंड, दुरनाळे यांनी मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रस्तावना सहशिक्षक कल्याण इंगळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहशिक्षिका आश्विनी कुलकर्णी यांनी मानले.यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी व शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button