Uncategorized

लोकसभा निवडणूक खर्च निरिक्षकांनी दिली मुखेडला भेट.

मुखेड / प्रतिनिधी

 नांदेड लोकसभा मतदारसंघाचे निवडणुक खर्च निरीक्षक मगपेन भुटिया यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ९१ मुखेड विधानसभा मतदार संघ येथे भेट दिली व निवडणुकीच्या अनुषंगाने तहसिल कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या विविध कक्षाचा आढावा घेतला आहे यादरम्यान त्यांचे स्वागत सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम व तहसिलदार राजेश जाधव यांनी केले.
 निवडणुक खर्च निरीक्षकांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने मुखेड तहसील कार्यालय येथे स्थापन केलेल्या व्हीव्हीटी कक्ष, मिडीया कक्ष, निवडणुक खर्च कक्ष,एक खिडकी कक्ष,मतदार मदत कक्षासह इतर कक्षाच्या पथकास भेट देवुन आढावा घेतला तसेच निवडणुक खर्च संदर्भात विविध रजिस्टरची व दैनिक अहवालाची पाहणी करुन सुचना व मार्गदर्शन केले त्यानंतर जांब बु.येथील एसएसटी (स्थीर) पथकास भेट देवून पाहणी केली.                            यावेळी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी, कुलदीप जंगम,तहसिलदार राजेश जाधव, निवडणुक विभागाचे नायब तहसिलदार अशोक लबडे, नायब तहसिलदार नंदकिशोर भोसीकर, नायब तहसिलदार पांडुरंग गंगनर, निवडणुक विभागाचे महसुल सहाय्यक संदीप भुरे, महसूल सहाय्यक प्रशांत लिंबेकर, तलाठी गोपीनाथ कल्याणकर,सुनिल कुलकर्णी, एन.एस. होनराव, राजु सुवर्णकार,एम.डी.बदेवाड मिडीया कक्षाचे पथक प्रमुख यु.एम.नारलावार, एस.जी. कुच्चेवाड, एस.डी.येनुरवार, रफिक बागवान उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button