रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठकसंपन्न…

मुखेड प्रतिनिधी :- आसद बल्खी
मुखेड पोलीस स्टेशन येथे दि 8 एप्रिल रोजी रमजान ईद निमित्त शांतता कमिटीची बैठक पोलीस निरीक्षक केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
यावेळी काझी सय्यद साबीर, पत्रकार आसद बल्खी ,नुरी मस्जिदचे विश्वस्त मदार दफेदार, गौसिया मस्जिदचे विश्वस्त सय्यद शमशोद्दीन, सामाजिक कार्यकर्ते शेख रफिक , शेख नबी , सय्यद रेहान, मेहबूब भाई पेंटर, शेख गफ्फार , ताहिर कुरेशी आदी उपस्थित होते.
यावेळी पोलीस निरीक्षक केंद्रे म्हणाले की रमजान ईद निमित्त ईदगाह मैदान व शहरातील सर्व मशीदीमध्ये सामुदायिक नमाजपठण करण्यात येत असून मुखेड तालुक्यात हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन रमजान ईद साजरी करण्याची परंपरा आहे आणि सर्वांनी मिळून ईद शांततेत व सलोखा कायम ठेऊन साजरी करण्याचे आवाहन केंद्रे यांनी केले आहे.
रमजान ईद निमित्त ईदगाह मैदान, बस स्टँड, लोखंडे चौक,महाजन पेट्रोल पंप, लातुर फाटा आदी ठिकाणी वाहतूक कोंडी होत असुन ईद दिवशी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा आदी विषयांवर चर्चा करण्यात आली .
शेवटी आभार हे काझी साबीर यांनी मानले



