Uncategorized

गुढीपाडव्यानिमित्त मुखेडमध्ये आज भव्य शोभा यात्रा

मुखेड / प्रतिनिधी

चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थातच गुढीपाडवा. चैतन्य आणि मांगल्याचा हा सण मंगळवारी साजरा करण्यात येत आहे. सकल हिंदु समाज बांधवाच्यावतीने दि. ९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता श्री वीरभद्र मंदिरापासुन भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात येत आहे. अशी माहिती सकल हिंदु समाजाच्यावतीने देण्यात आली आहे.

ही शोभायात्रा ग्रामदैवत श्री वीरभद्र मंदिरापासून दुपारी ३ वाजता सुरु होऊन श्री बालवीर हनुमान मंदीर झेंडा चौक श्रीराम मंदीर – जुने पोलिस स्टेशन डॉ. हेडगेवार चौक – बालाजी मंदिर – तेली पेठ हनुमान मंदिर बसस्थानक अशी मार्गस्थ होऊन छत्रपती शिवाजी स्मारकापाशी या शोभायात्रेचा समारोप होईल. या शोभायात्रेत प्रभू श्रीरामाची १५ फुटाची भव्य मुर्ती असणार आहे. या मुर्तीची शहरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

तसेच महादेव, नंदी, बजरंग बली असे विविध जीवंत देखावे सादर केले जाणार आहेत. दरवर्षी मोठ्या उत्साहात ही शोभायात्रा निघत असते. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सकल हिंदु समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या गुढी पाडव्याच्या दिवशी प्रभू रामचंद्र अयोध्येत रावणाचा वध करून दैत्यांवर विजय मिळवून आपला वनवास संपवून परत आले होते.

विजयाचे प्रतीक म्हणून त्या दिवशी पासून घरावर गुढी उभारली जाते. ती प्रथा आजही कायम आहे. यावर्षी अयोध्येत श्रीरामाचे मंदिर उभारले गेल्याने भक्तांमध्ये अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण आहे. भगवे झेंडे, भगव्या दस्त्या, भगव्या पताका लावण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button