मतदानाचे दुसरे प्रशिक्षण सुरू; आज ८०० कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण :- कुलदीप जंगम

८५ वर्षापेक्षा जास्त वय, दिव्यांग असे एकूण २३७ मतदार त्यांचे घरी जावून मतदान करुन घेण्याची व्यवस्था
मुखेड प्रतिनिधी;-
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ साठी दि २६ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल (मुलींचे) येथे मतदानाचे दुसरे प्रशिक्षण सुरू असून दिनांक १५ एप्रिल रोजी ८०० आणि आज दिनांक १६ एप्रिल रोजी ८०० कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी कुलदीप जंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तहसीलदार राजेश जाधव, अभियंता उत्तम नारलावार, शिवशंकर कुचेवाड, रफिक बागवान यांची उपस्थिती होती.
या प्रशिक्षणामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी यांना पिपीटी द्वारे मतदान प्रक्रिये बाबत प्रशिक्षण व प्रत्यक्ष मतदान यंत्र हाताळणी बाबत प्रशिक्षण देवून त्यांची चाचणी परिक्षा घेण्यांत आली. यामध्ये दिनांक १५ एप्रिल रोजी रोजी एकूण ८०४ कर्मचारी यांना प्रशिक्षणसाठी आदेशित करण्यांत आले होते. सदर प्रशिक्षणास मतदान केंद्राध्यक्ष १८७ व सहाय्यक
मतदान अधिकारी १९५ इतर मतदान अधिकारी ३९० असे एकूण ७७२ कर्मचारी उपस्थित होते. तसेच ३२ कर्मचारी प्रशिक्षणास गैरहजर होते. प्रशिक्षणा दरम्यान बाहेरील मतदार संघातून मतदान कर्तव्यासाठी किनवट, हदगाव येथून आलेल्या अधिकारी कर्मचारी यांचेसाठी व पोलीस कर्मचारी यांचेसाठी टपाली मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये एकूण १२७ मतदान झाले. यात मतदान केंद्राध्यक्ष व सहाय्यक मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांनी मतदान केले. उर्वरित केंद्राध्यक्ष व सहाय्यक मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी यांचेसाठी आज दि. १६ एप्रिल रोजी जिल्हा परिषद हायस्कुल ( मुलींचे) मुखेड येथे प्रशिक्षण ठेवण्यात आलेले आहे. मुखेड विधानसभा मतदान संघामध्ये एकूण ३६२ मतदान केंद्र असुन त्याकरिता एकूण १६०० मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान अधिकारी व इतर मतदान अधिकारी यांची नियुक्ती करण्यांत आलेली आहे. अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली.



