Uncategorized

मुखेडात डाॅ.बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची गर्दी उसळली

मुखेड प्रतिनिधी:-

क्रांतीसुर्य महामानव, भारतरत्न, विश्वरत्न , डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त दि. १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी स्मारकात अनुयांयाची मोठी गर्दी उसळली होती. तर सायंकाळी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिनिधी शहरात सामाजिक सलोका राखणाऱ्या विविध देखाव्यासह बाबासाहेबांच्या गीतावर आनंद उत्सव साजरा करण्यासाठी अनुयायी मिरवनुकित रस्त्यावर उतरला होता. तर पोलीस स्टेशन व बसस्थानकात जयंती साजरी करून अन्नदान करण्यात आले.
          भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब यांचा जन्म महोत्सव साजरा करण्यासाठी तालुक्यातील अनुयांयी आपल्या प्रत्येक घरावर विद्युत रोषणाई व घरासमोर रांगोळी टाकून फटाक्याचे आतिश बाजी करीत नवीन कपडे प्रधान करून नागरिक आनंद महोत्सवात सहभाग नोंदवला यात महिलांचा मोठा सहभाग दिसून येत होता बाबासाहेब स्मारक विद्युत रोषणाईने झगमग होते भिमराया घे तुझ्या या लेकराची वंदना या गीताने अनुयायी भावनिक होत बाबासाहेबा समोर नतमस्तक होत होते.
       दरम्यान शहरातील फुलेनगर, समता नगर, व्यंकटेश नगर, अशोक नगर, मिलिंद नगर व गायकवाड गल्ली येथून विविध सामाजिक सलोखा राखण्याच्या देखाव्यासह बाबासाहेब यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आले या विविध मिरवणुकीमध्ये काळजावर कोरले नाव, भीम के लगते जिगर, हम जय भिम वाले है, जीव गेला जरी आमचा जातीयतेच्या हल्ल्यात, माझ्या भिमान देश उचलला एका पेनाच्या टोकावर व नांदन नांदन होतं रमाचं नांदण यासारख्या अनेक गीतावर ठुमकण्यासाठी महिला व पुरुषांनी ठेका धरला होता.तर सायंकाळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणुकी दरम्यान न जागोजागी खिचडी व मिनरल वॉटर वाटप करण्यात आले तर बजरंग कल्याणी यांच्यातर्फे मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करून मिठाई वाटप करण्यात आले .सकाळच्या दरम्यान आंबेडकर स्मारकात
आ. डॉ. तुषार राठोड, तहसीलदार राजेश जाधव, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, दशरथराव लोहबंदे, डॉ दिलीप पुंडे, गौतम काळे, डॉ श्रावण रॅपनवाड, व्यंकटराव लोहबंदे, खुशाल पाटील उमरदरीकर, डॉ. अशोक कौरवार, डॉ. व्यंकटराव सुभेदार, उत्तम बनसोडे, राहुल लोहबंदे, संतोष बोनलेवाड, विनोद आडेपवार, अशोक गज्जलवाड, अनिल सिरसे, नागनाथ लोखंडे, शिवाजी गेडेवाड, अॅड संजय भारदे, संदीप कांबळे बावलगावकर, संतोष बनसोडे, मिलिंद लोहबंद, विजय लोहबंद, गंगाधर सोंडारे, गौतम लिंबेकर, मोहन गायकवाड, सिद्धार्थ कांबळे वेळीकर, गौसभाई मिर्झा, जयभीम सोनकांबळे, आसद बल्खी,बबलू मुल्ला, विशाल गायकवाड, एस के बबल्लु, अण्णासाहेब जाहीरे, संदीप काळे सह विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते, सामाजिक सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, डॉक्टर, वकील, पत्रकार, प्रतिष्ठित नागरिक तसेच अनुयायांनी अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. अभिवादन कार्यक्रमास व शहरातुन काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीस सर्व जयंती मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, महिला, पुरुष, युवक, युवती, बालक, बालीका व अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणुकी दरम्यान पोनि लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनात सपोनी विनोद चव्हान, पोउनी मंचक फड, पोलीस पाटील माधव टाकळे यांनी पोलिस कर्मचारी यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button