मुखेड तालुक्यातील अंबुलगा बु. येथे भूकंपाचे हादरे; भूगर्भातून दोन मोठे आवाज होवून अनेकांची घरे हादरली

मुखेड प्रतिनिधी:-
मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा बु. येथे २५ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन ते पावणे तिनच्या दरम्यानभूगर्भातुन एक मोठा आवाज येऊन अनेकांची घरे हादरत भूकंपाचा धक्का बसल्याने आंबुलगा व परिसरातभितीचे वातावरण पसरले आहे. आंबुलगा येथे भूगर्भात झालेल्या मोठ्या आवाजाने घरे हादरत असल्याचेलक्षात येताच हे भूकंप आहे असे म्हणत गावकरी घरातून बाहेर येत एकच गलका केला.
आंबुलगा येथे २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १४.४३ वाजता व १५.१३ वाजता दोनवेळा भूगर्भातून आवाज येऊनसौम्य हादरे जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रानी नोंद केल्याचे सांगण्यात येतआहे. या भूकंपसदृश्य हादऱ्याची तीव्रता रिष्टर स्केलवर अनुक्रमे १.५ व ०.७ अशी नोंदविण्यात आलेलीआहे. भूकंपाचा केंद्रबिंदू मुखेड शहरापासून १२ किमी दूर दक्षिणपूर्व दिशेला असून या धक्क्यामुळे कुठलीहीजिवीत व वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र जिल्हाधिकारीकार्यालय नांदेड यांनी दिली आहे. मात्र या भूकंपाच्या हादऱ्यामुळे आंबुलगा सह परिसरात भितीचे वातावरणपसरले आहे.



