Uncategorized

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकांच्या हत्येचा गुन्हा उघडकीस, आरोपी अटक

मुखेड प्रतिनिधी:- १५ ऑगस्ट २५

मुखेड शहराजवळील तांदळी येथील एका युवकाचा रक्ताच्या थारोळ्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना दि १२ ऑगस्ट मंगळवार रोजी घडली होतीया घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण पसरले होतेयाघटनेतील आरोपीस उघडकीस आणून अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होतेदि १४ गुरुवार रोजी पोलीसांनी या घटनेतील आरोपीचा शोध घेऊन त्यांस अटक करून मुखेड पोलीस ठाण्यात त्याचे विरुद्धखुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसारतालुक्यातील तांदळी येथील रहिवासी युवक बाबाराव बालाजी मेथे वय २७ वर्षे हा भाजीपाला  बाजार आणण्यासाठी मुखेड शहरात दि११ रोज सोमवारी आलापरंतुतो घरी परत  आल्याने त्याची शोधा शोध परिवारातील सदस्यांनी सुरू केली असता दि.१२ रोज मंगळवारी त्याचा नगरपरिषदेच्या फिल्टर पाणी टाकी समोर उमरदरी शिवारात रक्ताच्या थारोळ्यात अवस्थेत मृतदेह सापडला होताया गुन्ह्याचा तपास करून आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते पोलिसांनी तपास सुरू केला असता तांदळी येथील युवक बाबाराव मेथे  बालाजी वर्धमान भालेराव राहणार कुंद्राळा कँप तालुका मुखेड येथील युवक हे दोघे शहरातील एका दारूच्या दुकानात बसून दारू पिली  दारूची बॉटल सोबत घेऊन शहरातील नगरपरिषदेच्या पाणी टाकी समोर उमरदरी शिवारात आडोशाला बसून पुन्हा दारू पित असताना त्या दोघात किरकोळ वादातून बाचाबाची झालीबाचाबाची चेरूपांतर हाणामारीत झाले या हाणामारीत बालाजी भालेराव याने बाबाराव मेथे याच्या डोक्याला दगड मारला असता बाबाराव मेथे जमिनीवर खाली पडला  तो जमिनीवर पडल्याचे पाहून दुसरा मोठा दगडत्याच्या डोक्यात घातला यामध्ये बाबाराव मेथे हा जागीच मरण पावलापोलिसांनी या घटनेचा तपासकरून आरोपीचा शोध घेऊन आरोपीस दिनांक १४ रोज गुरुवार रोजी उदगीर येथील व्यसनमुक्ती केंद्रातून आरोपी बालाजी वर्धमान भालेराव राहणार कुंद्राळा कँप तालुका मुखेड यास अटक करून त्याच्याविरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक अविनाश कुमारअप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरवदेगलूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनात मुखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रेपोलीस उपनिरीक्षक मंचक फडपोलीस उपनिरीक्षक गणेश मानेपोलीस उपनिरीक्षक संदीप यामावारपोलीस उपनिरीक्षक अभिजीत तुतुरवाडपो.हे.कारवींद्र घुलेपांडुरंग पाळेकरवीरभद्र पाटीलमधुकर गोन्टेमन्मथ गोंडयादव इबितदारचालक गंगाधर जायभाये यांनी केलाया गुन्ह्याचा शोध करून आरोपीस अटक केल्याने तांदळी ग्रामस्थांनी पोलिसांचे कौतुक केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button