Uncategorized

मुखेड – नर्सी रोडवर केलेले अतिक्रमण तात्काळ काढा शहर काँग्रेसची मागणी

मुखेड -(ता. प्रतिनिधी) १५ ऑगस्ट २५

शहरातील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण केलेले पोटगाळे व्यापाऱ्यावर कार्यवाही करून अतिक्रमण काढण्यासाठी उप – अभियंता सां.बा.वि.मुखेड यांना काँग्रेस शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर यांनी दिले निवेदन. मुखेड – नर्सी रोड वरील दक्षिण भागातील कृषी उत्पन्न बाजार समिती, राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रवेशद्वार ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत मुळ दुकानदारांनी आपल्याच दुकानासमोरील रस्त्यावरील जागा ईतर व्यावसायीकांना पोटभाडे घेऊन फवारणीचे यंत्र दुरुस्ती, मेकॅनिकचे दुकान,हॉटेल्स बसवीले आहेत ज्यामुळे बाहेर बसलेले अतिक्रमणीत दुकानदार रस्त्याच्या मध्यभागापर्यंत आपले बस्थान स्थापीत केल्यामुळे या भागात रोज एक तरी अपघात किंवा मुलींना छेड काढण्याचे प्रकार पहायला मिळत असुन अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन नागरीकांना विविध समस्यांना,गैरसोयींना सामोरे जावे लागत असल्यामुळे त्याच भागातील व्यापाऱ्यांनी अतिक्रमण धारक पोट भाडेदारां विरोधात मुळ मालकासह त्यांची तक्रार सा.बा.वि. मुखेड कार्यालयात करुनही आजतागायत कुठलीच कार्यवाही झाली नाही मुखेड पत्रकार बांधवांनी सुद्धा याठीकाणी होत असलेली गैरसोय पाहता आपल्या वृत्तपत्रातून छापुन आणले तरीही बांधकाम विभाग सुस्त गेंड्याच्या कातडी सारखा कार्यरत असल्याचे दिसुन येते या भागातील मुळ दुकानमालका विरोधात तात्काळ कार्यवाही करून पोटभाडयाने राहणाऱ्या अतिक्रमणीत लोकांना हटवण्यात यावे अशा आशयाचे निवेदन सा.बा.वि. मुखेड यांना देण्यात आले.तात्काळ कार्यवाही न झाल्यास शहर काँग्रेस कमिटी मुखेडच्या वतीने मुखेड बांधकाम विभागासमोर आंदोलन करण्याचा ईशारा शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर,अल्पसंख्यांक काँग्रेस शहराध्यक्ष ईमराण पठाण,काँग्रेस शहर उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button