Uncategorized

नांदेड जिल्हयासाठी पाच दिवस येलो अलर्ट ;वादळी वारे व पावसाची शक्यता

नांदेड प्रतिनिधी:-

मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र यांनी आज (17 एप्रिल) रोजी दुपारी एक वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी आजपासून पुढील पाच दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणजेच 17 ते दि. 21 एप्रिल 2024  पर्यंत जिल्ह्यासाठी यलो अलर्ट राहणार आहे. त्यामुळे या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे. तसेच 17 ते 21 एप्रिल 2024 या दिवशी  जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह  पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button