Uncategorized

सावरगावचे भुमिपुत्र बापुराव सिध्देश्वरे शौर्य पोलिस पदकाने सन्मानित.

मुखेड / प्रतिनिधी

  केंद्रीय राखीव पोलिस दलातील हेड कॉन्स्टेबल तथा मुखेड तालुक्यातील मौजे सावरगाव (पी) येथील भुमिपुत्र बापूराव सुभाष सिद्धेश्वरे यांना दि.९ एप्रिल रोजी देशाची राजधानी दिल्लीत शौर्य दिनानिमित्त केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महानिदेशक अनिश दयाल सिंह सह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शौर्य पोलिस पदक देऊन सन्मानित करण्यात आले.सिद्धेश्वरे यांना पोलिस पदक मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.
  छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील मुरदडा येथे बापूराव सुभाष सिद्धेश्वरे यांनी सन २०१८ मध्यें कर्तव्यावर कार्यरत असताना अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेत मृत्यू डोळ्यासमोर दिसत असताना जिवाची बाजी लावून माओवादी नक्षलींना प्रत्युत्तर देत पिटाळून लावले होते.त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेवुन बापूराव सिध्देश्वरे यांना शौर्य पुलिस पदक देऊन सन्मानित करण्यात आले. २७ ऑक्टोबर २०१८ रोजी छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील मुरदडा भागातील जंगलात गस्तीवर असताना रस्त्यावर खड्डा करुन आयईडी सुरुंग नक्षलींनी पेरले होते आणि स्फोट घडवून पथकावरील अंदाधुंद गोळीबार केल्याने ४ जवान शहीद व २ जवान जखमी झाले होते.त्यात बापूराव सुभाष सिद्धेश्वरे व परमार हार्दिक सुरेश यांचा समावेश होता या दोघांनी प्रत्युत्तर देत नक्षलींना पिटाळून लावले होते.त्यामुळे साहस, पराक्रम,निष्ठा यामुळे हेड कॉन्स्टेबल सिध्देश्वरे बापूराव सुभाष यांना केंद्रीय राखीव पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते शौर्य पोलिस पदक देऊन नुकतच गौरविण्यात आले आहे.यावेळी उपस्थित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सिद्धेश्वरे यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button