Uncategorized

वक्फ संपत्तीतील घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी

मुखेडःप्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात वक्फ संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून झालेल्या घोटाळ्याची वक्फ मंडळाच्या समिती मार्फत कसुन चौकशी व्हावी व संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी व धरणे आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र ऑल इंडिया ऊलेमा बोर्डच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी मुबिन मुशिर यांनी आश्वासन दिल्यामुळे व रमजान महिना असल्यामुळे २६ मार्च रोजी चे आंदोलन स्थागित करण्यात आले होते मात्र दिलेल्या लेखी तक्रारीची अद्यापही चौकशी झाली नाही त्यामूळे ऑल इंडिया ऊलमा बोर्ड च्या वतीने संबंधीत प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे, वक्फ मालमत्ता अधिनियम ५४, ५१अ, ५२ चे प्रलंबित प्रकरण तात्काळ निकाली काढणे व महाराष्ट्रा मध्ये वक्फ मालमते वर झालेले आतिक्रमण काढून संबधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी आठवड्यातुन दोन दिवस महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ कार्यालय औरंगाबाद येथे उपस्थितीत राहून प्रलंबित असलेले प्रश्न निकाली काढावे दिनांक १३/१४ फेब्रुवारी रोजी वक्फ मंडळाच्या बैठकीत रद्द करण्यात आलेली तात्काळ जिएसटी आमलात आणुन जिएसटी घेणे बंद करण्यात यावे, नांदेड जिल्ह्यातील मौजे सलगरा खुर्द ता. मुखेड येथील फाईल क्र. ६९/१६७ / २०२० हेरींग ( सुनावनी) होवून १९ महीने झाले असुन आजपर्यंत अंतिम निर्णय झाले नाही तात्काळ अंतिम निर्णय देण्यात यावे त्याचबरोबर मौजे सलगरा खुर्द ता. मुखेड जि.नांदेड येथील मुस्लिम कब्रस्तानमधे ६२ आर जमिनीवर झालेले अतिक्रमण तात्काळ काढून संबंधितावर कारवाई करण्यात यावे.

अन्यथा ऑल इंडिया उलमा बोर्ड च्या वतीने दि.२२ एप्रिल रोजी मुख्यकार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ कार्यालय पंनचकी छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे आंदोलन छेडण्याचा इशारा ऑल इंडिया उलमा बोर्डचे मराठव- डा अध्यक्ष शेख गौसअली अमिन सहाव यांनी लेखी निवेदनाद्वारे संबंधित प्रशासनाला दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button