Uncategorized
वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावणाऱ्या कोल्हेगावचे उपसरपंचावर कारवाई करण्याची मागणी
मुखेड प्रतिनिधी:-
वारकरी संप्रदायातील अतिशय पवित्र असणाऱ्या विण्याला दारूची बाटली लावून सोशल मिडीयावर फोटोव्हायरल करणाऱ्या हरेश जोशी यांचा निषेध करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावे, अशी मागणी बाळासाहेबांच्या शिवसेनेने केली आहे. कोल्हेगावचा उपसरपंच हरेश रामदास जोशी याने संप्रदायातील अतिशय महत्त्वाचा व पवित्र अशा विण्याला दारूची बाटली लावून सोशल मिडीयावर फोटो व्हायरलकेल्याप्रकरणी संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे याच्यावर कठोर कार्यवाहीकरावी व त्याला जेलबंद करण्यात यावे असे मागणी पोलीस ठाण्याला दिलेल्या निवेदनातून करण्यातआली आहे. या निवेदनावर बजरंग कल्याणी, शंकर पाटील लुट्टे, पवन पोतदार, गजानन लोखडे, संभाजीमिद्देवाड, संजय मुद्देवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



