Uncategorized

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा


मुखेड प्रतिनिधी:-
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजनकल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभ विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन समाज कल्याण अधिकारी श्री बापू दासरी यांनी केले.
विविध कल्याणकारी योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या विभागाच्या वतीने तालुका मेळाव्याचे आयोजन माध्यमिक आश्रम शाळा कमळेवाडी येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाज कल्याण अधिकारी श्री बापू दासरी बोलत होते.
या मेळाव्यास कमळेवाडीचे मुख्याध्यापक श्री संदीप गेटकेवार प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक रामराव राठोड, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री पांडुरंग गरजे ज्येष्ठ शिक्षक श्री यशवंत बोडके आदी उपस्थित होते.
एवढी बोलताना बापूदासरी पुढे म्हणाले की मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी राज्यभरात आश्रम शाळा चालवल्या जातात ऊसतोड कामगारांच्या मुला मुलीसाठी निवासी आश्रम शाळा ही बीड जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आल्या असून पाल्यांसाठी राज्यातील एकमेव असे विद्यानिकेतन कमळेवाडी येथे कार्यरत असून या योजनांचा लाभ इतर मागास बहुजन समाजातील पाल्यांनी घ्यावा या विभागाच्या वतीने मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती प्रदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना ही राबवली जाते वस्तीगृह आधार योजना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि घरकुल पायाभूत सुविधा बाबतच्या योजना यामध्ये वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना विजाभजच्या घटकासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजना आदी योजना सुरू असून या योजनांचा लाभ मोठ्या संख्येने लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन श्री बापू दासरी यांनी केले.
मेळाव्याचे प्रास्ताविक आणि मान्यवरांचे स्वागत संयोजक तथा माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप गेटकेवार यांनी केले. यावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री यशवंत बोडके यांनी आश्रम शाळा स्थापने मागचा उद्देश राज्यातील एकमेव अशा पब्लिक स्कूल कमळेवाडी या योजनेबद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले.
यावेळी विस्तार अधिकारी श्री पांडुरंग गर्जे यांनीही आपले विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री राजकुमार मेहकर यांनी केले. मेळावा यशस्वीतेसाठी संदीप परकंठे, संदीप गुंटूरकर, सिद्धांत कांबळे, धोंडीबा पवार, शिवाजीराव चव्हाण, गणपतराव डावखरे, संगम मठपती पंडित श्रीरामे प्रवीण चौडेकर आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button