Uncategorized

पावसाळी क्रीडा स्पर्धेत आश्रम शाळा कमळेवाडीचा कबड्डी संघ अजिंक्य!


मुखेड : तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेत माध्यमिक आश्रम शाळा कमळेवाडीचा कबड्डीचा संघ अजिंक्य ठरला असून या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या मैदानावर तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा सुरू असून या ठिकाणी संपन्न झालेल्या कबड्डी स्पर्धेत माध्यमिक आश्रम शाळा कमळेवाडीचा 17 वर्षे वयोगटा खालील मुलांच्या कबड्डी मुलांच्या संघाने आपल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करीत अजिंक्यपद पटकाविले आहे.
या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. यात शाळेच्या 17 वर्षे वयोगटाखालील कबड्डीच्या मुलींच्या संघानेही मात करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
यशस्वी खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक सिद्धांत कांबळे, संदीप गुंटूरकर, आरती लिंगनवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे सचिव गंगाधरराव राठोड, आमदार डॉ. तुषार राठोड, मुख्याध्यापक संदीप गेट केवार, मुख्याध्यापकशमशुद्दीन शेख मुख्याध्यापक आर.डी. राठोड आदींनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button