वैतागलेल्या मुलानेच वडिलांची सुपारी देऊन केली हत्या

वजीराबाद गुन्हे शोध पथकाची कामगिरी
मयताच्या मुलांसह इतर दोन आरोपीना केले अटक
नांदेड प्रतिनिधी:-
नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडिलांच्या अनैतिक संबंधांमुळं वैतागलेल्यामुलानेच वडिलांची सुपारी देऊन हत्या घडवण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याघटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने मित्रालाचवडिलांच्या हत्येची सुपारी दिली असल्याचेही समोर आले आहे. तर,मिळालेल्या माहितीनुसार, वडील नेहमीआईसोबत भांडत असल्याच्या रागातून 20 वर्षीय मुलानेच आपल्या वडिलांच्या हत्येची सुपारी देऊन त्यांनासंपवले. नांदेड शहरात ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. शेख युनूस शेखपाशा असं मयत व्यक्तीचं नाव आहे. ते खडकापुरा भागातील हॉटेल व्यावसायिक होते.
शेख युनूस शेख पाशा यांचे पत्नीशी नेहमी भांडण होत असे. तसंच, शेख युनूस यांच्या बाहेर एकामहिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळं त्यांच्यात सतत वादविवाद होत होता. या त्रासाला कंटाळून त्यांचामुलगा शेख यासेर याने त्याच्या एका मित्राला वडिलांची हत्या करण्यासाठी 2 लाखांची सुपारी दिली. त्याच्या मित्राने मनमाड येथील दोघांना हत्येची सुपारी दिली. हॉटेल व्यावसायिक शेख युनूस यांचा मृतदेहत्यांच्या घरी रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता.
पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज आणि सायबर सेलच्या सहाय्याने या गुन्ह्याचा कसून तपास सुरू केला. तेव्हामुलानेच वडिलांच्या हत्येची सुपारी दिल्याची बाब समोर आली. या प्रकरणात पोलिसांनी तिन्ही आरोपींनाअटक केली आहे.
वर नमुद अज्ञात खुनाचा गुन्हा उघड करुन चांगली कामगिरी केल्याने अविनाश कुमार पोलीस अधिक्षक, नांदेड, सुरज गुरव अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, किरितिक सी.एम., सहायक पोलीस अधिक्षक, उप विभाग, नांदेड शहर, यांनी नमुद परमेश्वर कदम, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद पोलीस ,तपास अधिकारी सपोनी प्रशांत लोंढे, गुन्हे शोध पथकाचे आर. डी वटाने, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार पोहेकॉ दत्तराम जाधव, पोहेकॉ//विजयकुमार नंदे, पोहेकॉ / मनोज परदेशी, पोना/ शरदचंद्र चावरे, पोकों/ बालाजी कदम, पोकों/ रमेश सूर्यवंशी, पोकॉ/ इम्रान शेख, पोकों / भाऊसाहेब राठोड, पोकों / अंकुश पवार व सायबर सेल नांदेड येथील पोहेकॉ राजेंद्र सिटीकर, पोहेकॉ दिपक ओढणे व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.



