Uncategorized
संतोष राठोड यांच्या नेतृत्वात शेकडो युवकांचा शिवसेनेत प्रवेश.

मुखेड मतदारसंघात वाहु लागले विधानसभा निवडणुकीचे वारे.
मुखेड / प्रतिनिधी.
माजी आमदार कर्मवीर किशनराव राठोड यांचे नातू माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष राठोड यांच्या नेतृत्वात व शिवसेनेचे जिल्हा समन्वयक दशरथराव लोहबंदे यांच्या प्रमुख उपस्थिती राठोड यांच्यावर विश्वास ठेवून मुखेड तालुक्यातील शेकडो युवकांनी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे.त्यामुळे शिवसेना उबाठा पक्षात कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात आवक सुरु झाल्याची चर्चा मतदारसंघात होताना एैकवयास मिळत आहे.
शिवसेनेचे युवा नेते, माजी जि.प.सदस्य संतोष राठोड हे मागील एक ते दीड वर्षापासून मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघात नागरिकांच्या समस्यां,अडीअडचणी जाणून घेत भेटी-गाठी व मतदारांशी संवाद साधत आहेत.त्यामुळे विधानसभा मतदारसंघातील युवक संतोष राठोड यांच्यासोबत जुळत शिवसेना पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत.या सर्व घटना घडामोडीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात वेगळे चित्र पहावयास मिळणार आहे.नुकतच माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक दशरथराव लोहबंदे, युवा नेते माजी जि.प.सदस्य संतोष राठोड यांच्यावर विश्वास ठेवुन शेकडो कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केले आहेत यावेळी माजी उपनगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय बेळीकर, महिला जिल्हाप्रमुख सौ.जनाबाई नाकाडे, उपतालुकाप्रमुख शरद सावकार कोडगीरे, युवा तालुका प्रमुख योगेश मामीलवाड यांची उपस्थिती होती.
आगामी विधानसभेसाठी माजी जिप सदस्य संतोष राठोड यांनी मतदारसंघात संवाद दौरा सुरु केला असुन त्यांच्या या दौ-यास मतदारसंघातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे. गावोगावी भेटी देऊन अडीअडचणी समजून घेऊन त्या शासन दरबारी सोडवण्याचा प्रयत्न राठोड करत असताना दिसत आहेत.मुखेड-कंधार विधानसभेसाठी संतोष राठोड यांचे नाव चर्चेत आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शुभम खांडेकर,अजय नाईक,तुकाराम नाईक,सचिन पांडुर्णीकर,कृष्णा गजभारे यांच्यासह शेकडो युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला
आगामी विधानसभेची निवडणूक चुरशीची होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मुखेड-कंधार मतदार संघ हा महाविकास आघाडीत काँग्रेसला आहे पण या मतदारसंघात १९९९ व २००४ या पंचवार्षिक निवडणूकीत १० वर्ष शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे.त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात यावा अशी मागणीसुद्धा शिवसेनेच्या पदाधिका-यांनी विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांच्याकडे ते नांदेड येथे आले असताना केली आहे.



