छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोरील उपोषणाला चौथ्या दिवशी यशस्वी माघार

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजितकरण्याबाबतचे पत्र मुख्याधिकारी यांनी दिले.
मुखेड प्रतिनिधी:-
मुखेड शहरातील छ.शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा अल्प कालावधीत झिजला असून पुतळ्ळ्यावरची कोटिंग खरबडून गेली आहे. परिणामी विद्वपी– करण झालेले आहे. एका हाताने हलवल्यावर पुतळा हालत आहे. सदर पुतळ्याचा भार हा शेपटीवर आहे. पुतळ्याचा चबुतरा हा कमकुवत झाला आहे. पुतळ्याचा पायाचा पोकळ जागेत पाणी साचून ते ठिबकत आहे या मुळेछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त होण्याची दाट शक्यता असल्यामुळे हा पुतळा नव्यानेउभारण्याच्या मागणीसाठी व इतर पाच विविध मागण्या घेऊन शिवप्रेमी श्याम पाटील इंगोले दि. ९ सप्टेंबररोज पासून शिवाजी महाराज स्मारकासमोर उपोषण सुरू केले होते. या उपोषणला १२ सप्टेंबर रोजीच्याचौथ्या दिवशी तिडा सोडवण्यात प्रशासनाला यश आले आहे.
दरम्यान सदरील उपोषणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवप्रेमी शिवाजी गेडेवाड, सचीन पाटीलइंगोले, गिरीधर पा. केरूरकर, प्रदीप पा हसनाळकर, शुभम पा. जाधव, शंकर वड्डेवार, प्रविण मारकवाड, राजु कोनापूरे, अविनाश इंगळे पाटील, योगेश पा. हिवराळे, प्रतापराव चौधरी, बालाजी पा इंगोले श्रीनिवासपा. जाधव यांनी दि १२ सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे इशारा दिला होता.
या इशारा देताच दि १२ सप्टेंबर रोजी पोलीस प्रशासन अलर्ट मोडमध्ये आले होते. यासाठी तहसीलदारराजेश जाधव मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी उपोषणकर्त्याचेमनधरणी करण्याचा प्रयत्न केला, पण शिवप्रेमी उपोषण करते नगर परिषदेच्या वतीने पुतळा दुर्घटनाग्रस्तहोण्याची शक्यता असलेले पत्र जिल्हा अधिकाऱ्यांना देणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचेसांगितले. त्यानंतर सदरील उपोषणकर्त्याची मागणी प्रशासन्य मान्य केलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषणमागे घेण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, युवा नेते शिवाजी गेडेवाड, काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव डॉ. श्रावण रॅपनवाड, रावसाहेब पाटील तडखेलकर,राहुल नावंदे, गंगाधर पाटील, सचिन पाटिल इंगोले,सुरेश पाटील बेळीकर, संतोष पा .इंगोले,गिरीधर पाटील, जयभिम सोनकांबळे, एस. के. बबलू, अशोक बच्चेवार, दिनेश पाटील केरूरकर, विश्वा गायकवाड ,प्रकाश शुभंजे यासह असंख्य शिवप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते



