देश जनहित पार्टी च्या मराठवाडा अध्यक्षपदी अब्दुल रईस यांची निवड

नांदेड प्रतिनिधी:-
येथील शिवाजी नगर येथील रहिवाशी अब्दुल रईस अहेमद अब्दुल जब्बार यांची देश जनहित पार्टी च्या मराठवाडा प्रदेश प्रभारी पदी निवड करण्यात आली.
देश जनहित पार्टीचे पदाधिकारी अब्दुल रईस अहेमद अब्दुल जब्बार यांच्या सामाजिक, राजकीय कार्याची तसेच पक्ष वाढीसाठी त्यांच्या कार्याची दखल घेऊन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद (बालु) मेश्राम यांनी त्यांची मराठवाडा प्रभारी पदी नेमणूक झाल्याचे आपल्या स्वाक्षरीचे पत्र दिले आहे. त्यांची मे २०२७ पर्यंत सदरील पदावर नियुक्ती असून पार्टीचे ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवून मराठवाड्यामध्ये पार्टीला उभारी देण्याचे काम अब्दुल रईस अहेमद अब्दुल जब्बार हे करतील अशी अपेक्षा नियुक्ती पत्रातून देश जनहित पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद (बालु) मेश्राम यांनी व्यक्त केली आहे. अब्दुल रईस अहेमद अब्दुल जब्बार यांची देश जनहित पार्टी च्या मराठवाडा प्रदेश प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे आप्त स्वकीय, पार्टीचे पदाधिकारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.



