Uncategorized

विधानसभेसाठी ऑक्टोबरच्या ‘या’ तारखेला आचारसंहिता लागणार; शिंदे गटाच्या नेत्याने उघड केलीरणनीती

मुंबई:- महाराष्ट्र विधानसभेचे निवडणूक कधी लागणारयाची संपूर्ण राज्याला उत्सुकता आहेत्या पार्श्वभूमीवरमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी थेट आचारसंहिता लागू होण्याचीतारीखच सांगून टाकली आहेत्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग येत्या काही दिवसांतनिवडणूक आयोगाकडून फुंकले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हरियाणा विधानसभा निवडणुकीबरोबर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होत असतेमात्रकेंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी केवळ हरियाणाविधानसभेचीच निवडणूक जाहीर केलीनिवडणूक आयोगाच्या त्या निर्णयावर राज्यातील विरोधीपक्षाकडून जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले होते.

सत्ताधारी पक्षाच्या सोयीसाठी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पुढे ढकलली गेली आहेअसा गंभीर आरोपविरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगावर  लावण्यात आले होतेमात्रमहाराष्ट्रातील मुसळधार पावसाचे कारण देऊन विधानसभेची निवडणूक जाहीर केली नाहीअसेस्पष्टीकरण मुख्य निवडणूक आयुक्तांनी त्याच वेळी दिले होते.दरम्यान, शिंदे गटाच्या शिवसेनेचे प्रतोद, आमदार भरत गोगावले यांनी माध्यमाशी संवाद साधताना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी येत्या पाच ऑक्टोबर रोजी आचारसंहिता लागू होईल, असे बेधडकपणे सांगून टाकले, त्यामुळे ऐन दिवाळीच्या धामधुमीत विधानसभेसाठी निवडणुकीचा प्रचार रंगण्याची शक्यता आहे. काही दिवस प्रचार होऊन विधानसभेसाठी मतदान होईल.असेही गोगावले यानी सांगितले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button