Uncategorized

धक्कादायक पोलिसानं पत्नीवर झाडल्या गोळ्या, हत्येनंतर स्वत:च झाला ठाण्यात हजर

नांदेड, प्रतिनिधी : नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. पोलीस कर्मचाऱ्यानं गोळ्या झाडून आपल्या पत्नीची हत्या केली. त्यानंतर तो स्वत: ग्रामीण पोलीस ठाण्यातहजर झाला. अफजल पठाण असं या आरोपीचं नाव आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातल्या धनेगाव परिसरातघडली आहे. आरोपी हा नांदेड येथील विमानतळ ठाण्यात हेड कॅन्स्टेबर म्हणून कार्यरत आहे. घटनेबाबतअधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कुटुंबातील किरकोळ वादातून पोलीस कर्मचाऱ्यानं टोकाचं पाऊलउचललं आहे. त्याने आपल्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली आहे. अफजल पठाण असं या आरोपीचंनाव आहे. तो नांदेड येथील विमानतळ ठाण्यात हेड कॅन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. तर नाजीम बेगम असंहत्या झालेल्या महिलेचं नाव आहे.

अफजल पठाण यांचे त्यांची पत्नी नाजीम बेगम यांच्यासोबत काही कारणामुळे भांडण झालं. भांडणाचा रागमनात असल्यामुळे त्यांनी आपल्या जवळ असलेल्या बंदुकीतून पत्नीवर गोळ्या झाडल्या. या घटनेत गंभीरजखमी झालेल्या नाजीम बेगम यांचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर अफजल पठाण हा स्वत: ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरूअसल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button