Uncategorized

मुखेडमध्ये पैगंबर मोहम्मद स.अ यांचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा.

मुखेड प्रतिनिधी:- ईदमिलादउननबीचा सण आज दि १९ सप्टेंबर रोज गुरुवारी मुखेड शहरात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आलायावेळी मस्तानशाह  वली दरगाह येथे प्रार्थना व परसाद वाटप करुन मिरवणूक काढण्यात आलीही मिरवणूक तगलाईन रोड मार्गे मुख्यरस्ता,शहरी बाजारपेठ व  चौक मस्जिद कडे फिरलीयावेळी राहुल लोहबंदे मित्र मंडळाच्या वतीने जुलुस रॉलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषद या सामाजिक संघटनेच्या वतीने थंड पाणी व समाजाच्या वतीने खाऊ, फळे वाटप करण्यात आले शहरातील लोकांनी ईद मिलादुन्नबीचा सण उत्साहात साजरा केलात्याच मोहम्मदी मिरवणुकीत मोठ्या संख्येने लहान मुलेतरुणवृद्धसहभागी झाले होते.मोहम्मदी प्रेमीनी हातात इस्लामी झेंडे घेऊन जश्ने ईदमिलादउननबी जिंदाबाद, नारे तकबीर अल्लाहू अकबर,लबैक या रसुलुल्हा या घोषणा देत मिरवणुकीत सहभागी झाले. बसस्टँड चौक येथे हाफिज अब्दुल गफ्फार,गरीब नवाज मस्जिद जुबेर मौलाना रजा मस्जिद ,असलम मौलाना नूरी मस्जिद,राशिद रजा मदिना मस्जिद,सिराज रजा गौसिया मस्जिद आलिम ओवेश रजा चौक मस्जिद यांनी सांगितले कीइस्लामचेशेवटचे पैगंबर हजरत मोहम्मद पैगंबर स.अ  यांच्या जन्मदिनानिमित्त ईद मिलादुन्नबी हा सण साजरा केलाजातोया दिवशी मुस्लिम समाजातील लोक इस्लाम धर्माचे प्रवर्तक हजरत मोहम्मद यांचा जन्मोत्सवसाजरा करतातमिरवणुकी व्यतिरिक्तया दिवशी इस्लाम धर्माचे पालन करणारे लोक एकमेकांना शुभेच्छादेतात आणि मिठाई वाटली जातातमान्यतेनुसार पैगंबर हजरत मोहमद  स.अ यांनी अल्लाहचा संदेशलोकांपर्यंत पोहोचवला होता आणि जगाला मानवतेचा धडा शिकवला होतात्यांनी जगाला शांतीचा संदेशदिलाइस्लाम धर्माचे शेवटचे पैगंबर म्हणून हजरत मोहम्मद स.अ  जगात आलेज्याने इस्लाम धर्माचा प्रचारकेला.ज्या काळात समाजात अन्यायविषमता आणि अज्ञान पसरले होते त्या काळात मोहम्मद साहिब यांनी इस्लामचा प्रचार केलात्यांनी सत्यकरुणाबंधुता आणि अल्लाहवरील अतूट विश्वासाचा संदेश दिला.मानवतेचे कल्याण आणि सामाजिक सुधारणा हे त्यांच्या जीवनाचे मुख्य उद्दिष्ट होतेत्यांनी गरीब आणिदुर्बलांच्या बाजूने आवाज उठवला आणि प्रत्येक मानवासाठी समानता आणि न्याय याबद्दल बोललेत्यांचेजीवन हे साधेपणा आणि संयमाचे प्रतीक होते हाफिज अब्दुल गफ्फार म्हणाले ,आज एक देश आहे आणि तिथे सर्व लोक आहेतआम्हाला आमच्याजन्मभूमीचा अभिमान आहेसर्व भारतीयांनी परस्पर बंधुभाव जपला पाहिजेहे सर्वांच्या फायद्याचे आहे. आज जाती आणि धर्माच्या नावावर मानवतेत फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहेपण आपण सर्वभारतमातेचे पुत्र आहोतपैगंबरांनी सांगितलेल्या बंधुभावाच्या मार्गावर चालले पाहिजेप्रत्येक माणुससारखाच आहेएकोपा निर्माण करून एकमेकांना मदत केली पाहिजेआज देशाला विकासाच्या मार्गावरपुढे जाता यावे यासाठी शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. असेही ते म्हणाले ईद-ए मिलादुन्न नबी निमित्त शहरातुन काढण्यात आलेल्या मिरवणुकीस मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर,तहसीलदार राजेश जाधव, माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड, माजी नगरसेवक राहुल लोहबंदे यांनी भेट देवून जुलुसमध्ये सहभाग नोंदवत मुस्लिम बांधवाना ईदनिमीत्त शुभेच्छा दिल्या. पोलिस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे व सपोनी रवी हुड्डेंकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कमेटीच्या वतीने पोलीस निरीक्षक केंद्रे यांचा पुष्पहाराने स्वागत करण्यात आल या वेळी रजा चौक मस्जिद, गरीब नवाज मस्जिद, नूरी मस्जिद  फुलेनगर, मदिना मस्जिद, गौसिया मस्जिदचे  प्रतिष्ठित नागरिक, युवक,बालक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button